शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
4
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
5
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
6
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
7
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
8
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
9
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
10
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
11
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
12
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
13
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
14
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
15
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
16
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
17
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
18
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
19
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी परीक्षेस होणार प्रविष्ट

By admin | Updated: July 19, 2014 23:55 IST

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत मार्च २०१४ व त्यापूर्वीच्या परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमात अनुत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना सप्टेंबर-आॅक्टोबर

पुनर्रचित अभ्यासक्रमात : अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सप्टेंबरपासून समावेशदेसाईगंज : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत मार्च २०१४ व त्यापूर्वीच्या परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमात अनुत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना सप्टेंबर-आॅक्टोबर २०१४ मधील परीक्षेस पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार प्रविष्ट व्हावे लागणार आहे. अशा प्रकारचा ठराव नुकताच कार्यकारी परीक्षेत झाला असून त्याची अंलबजावणी येत्या सप्टेंबर-आॅक्टोबरच्या बोर्डाच्या परीक्षेपासून होणार आहे. इयत्ता दहावी गणित व सामान्य गणित या विषयाची नवीन अभ्यासक्रमानुसार १०० गुणांची प्रथम परीक्षा मार्च २०१४ मध्ये घेण्यात आली. मार्च २०१४ व त्यापूर्वी सदर विषयाची परीक्षा १५० गुणांची होती व त्यापैकी ३० गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी होते. आत गणित व सामान्य गणित या विषयासाठी पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार निर्धारीत केलेले ८० गुण लेखी परीक्षेसाठी अंतर्गत मूल्यमापनासाठी राहणार आहेत. २० गुणांसाठी अनुत्तीर्ण खासगी विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका पूर्ण करून सदरचे अंतर्गत त्या-त्या शाळांमधून प्राप्त करून घेता येईल. तसेच १० वी, १२ वीच्या २०१४ तील भाषा विषयातील २० गुणांची तोंडी परीक्षा पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार द्यावी लागणार आहे. सामाजिकशास्त्र (वर्ग १०) विषयाच्या अंतर्गत खासगी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्वाध्याय पुस्तिका पूर्ण करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. १० वीसाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हा विषय नव्याने अनिवार्य विषय म्हणून अंतर्भूत केला आहे. मार्च २०१४ च्या जुन्या व त्यापूर्वीच्या अभ्यासक्रमाचे अनुर्त्तीण विद्यार्थ्यांना या विषयाची परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. मात्र २०१४ च्या विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान विषयाची लेखी व प्रात्याक्षिक परीक्षा पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार द्यावी लागेल. वर्ग १२ वी, ज्या विषयांना प्रकल्प व अंतर्गत कार्य निर्धारित केले आहे. अशा विषयाची ८० गुणांची लेखी परीक्षा पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होईल. मात्र या विषयाचे प्रकल्प अंतर्गत कार्य त्यांना करावे लागेल. ही जबाबदारी कनिष्ठ महाविद्यालयांची राहणार आहे. ज्या विषयांना प्रात्यक्षिक निर्धारित केली आहे. अशा विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा पुनश्च घ्यावी लागणार आहे. जे विद्यार्थी जुन्या अभ्यासक्रमानुसार अनुत्तीर्ण झाले असतील त्यांना आरोग्य व शारीरिक शिक्षण, पर्यावरण शिक्षण या विषयाची परीक्षा द्यावी लागणार नाही. मात्र आरोग्य व शारीरिक शिक्षण या शालेय श्रेणी परीक्षेस प्रविष्ट व्हावे लागेल, तसेच पर्यावरण शिक्षण विषयाचे प्रकल्प पूर्ण करावे लागतील, मौखिक व प्रात्यक्षिक परीक्षाही नव्याने द्यावी लागेल. व्यावसायिक व द्विलक्षी या विषयाच्या अभ्यासक्रमात व मूल्यमापन योजनेत बदल नसल्याने लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पध्दतीने होतील. त्यामुळे पुनर्परीक्षार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमानुसार यापूर्वी दोन संधी देण्यात आलेल्या असल्यामुळे सप्टेंबर-आॅक्टोबर २०१४ च्या परीेक्षेच्या वेळी पुनश्च संधी नाकारण्यात आल्याने आता परीक्षार्थी विद्यार्थ्यांना २०१४ ची परीक्षा पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार प्रविष्ट व्हावे लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)