लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : नगर पंचायत क्षेत्रातील गडअहेरी, गडबामणी, चेरपल्ली आदी गावांकरिता वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.अहेरी शहरातील सर्व वॉर्डात जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. परंतु गडअहेरी, गडबामणी, चेरपल्ली आदी तीन गावात पाणीपुरवठा होत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. नदी व नाले जवळ असतानाही एक किमी अंतरावरून पाणी आणावे लागते.विशेष म्हणजे, पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सदर तीन गावांमध्ये २ कोटी ६३ लाख रूपये निधीच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव जीवन प्राधिकरणने तयार केला असून प्रशासकीय मंजुरीकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.
वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:02 IST
नगर पंचायत क्षेत्रातील गडअहेरी, गडबामणी, चेरपल्ली आदी गावांकरिता वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करा
ठळक मुद्देअहेरी न. पं. क्षेत्र : गडअहेरी, गडबामणी, चेरपल्लीतील नागरिकांची मागणी