शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींची समाेरासमाेर धडक; टेलर्स व्यावसायिक ठार

By गेापाल लाजुरकर | Updated: September 16, 2023 18:36 IST

दाेघे जखमी : अहेरी तालुक्यातील घटना

गडचिराेली : एटापल्ली- आलापल्ली मार्गावर मद्दीगुडम-रामय्यापेठा ह्या गावादरम्यान दाेन दुचाकींची समाेरासमाेर धडक झाल्याने या घटनेत दुचाकीस्वार टेलर्स व्यावसायिक ठार तर दुसऱ्या दुचाकीवरील दाेघेजण गंभीर जखमी झाले ही, घटना अहेरी तालुक्याच्या हद्दीत शुक्रवार १५ सप्टेंबर राेजी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास घडली.

किशोर निलीवार (५२) रा. एटापल्ली असे अपघातात ठार झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. चैतु आरे मडावी (३५), बंडू कारे मडावी (३५) रा. पंदेवाही ता. एटापल्ली हे दाेघे गंभीर जखमी झाले. एटापल्ली येथील पद्मशाली समाजाचे तालुकाध्यक्ष तथा टेलर्स व्यावसायिक किशोर निलीवार हे एटापल्लीवरून आलापल्ली येथे काही कामानिमित्त दुचाकीने जात होते. याचवेळी चैतू मडावी व बंडू मडावी हे दोघेही एका दुचाकीने आलापल्लीवरून एटापल्लीकडे येत होते. या दोन्ही मोटसायकलींची मद्दीगुडम-रामय्यापेठा गावादरम्यान समोरासमोर धडक झाली. यात किशाेर निलीवार हे जागीच ठार झाले. तर चैतू मडावी व बंडू मडावी हे दाेघेही गंभीर जखमी झाले. जखमींना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अपघात एवढा जाेरदार हाेता की, एका दुचाकीचे समोरचे चाक दुचाकीपासून वेगळे झाले. दाेन्ही जखमींना सध्या चंद्रपूर येथे उपचारार्थ दाखल केले. निलीवार यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व नातवंड आहेत.

नामकरण व तान्हा पाेळ्यावर विरजनकिशाेर निलीवार यांच्या नातवंडाचा नामकरण विधी दाेन दिवसांपूर्वीच एटापल्लीत झाला हाेता. कुटुंबात आनंद असतानाच निलीवार यांच्या मृत्यूने शाेककळा पसरली. त्यांच्या मृत्युची बातमी कळताच गावात तान्हा पोळा भरविला नाही. शनिवारला व्यापारपेठ बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली. शुक्रवारी याच मार्गावर दोन दुचाकींचा असाच अपघात होऊन दोन युवक जखमी झाले हाेते.

टॅग्स :Accidentअपघात