शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीच्या वरातीआधीच निघाली भावाची अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:11 IST

कुटुंबात एखाद्याचे लग्न असले की संपूर्ण कुटुंब आनंदात न्हाऊन निघते. बहिणीचे लग्न असल्यास भावाच्या उत्साहाला पारावार राहात नाही. मात्र कोकडी येथील गुरूदेव उमाजी टिकले (२५) हा भाऊ या बाबतीत अभागी ठरला. लहान बहिणीचे लग्न केवळ एक दिवसावर असताना गुरूदेवची प्राणज्योत मावळली.

ठळक मुद्देकोकडीत शोककळा : घरी लग्न असताना आदल्या दिवशी गुरूदेवचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा/तुळशी : कुटुंबात एखाद्याचे लग्न असले की संपूर्ण कुटुंब आनंदात न्हाऊन निघते. बहिणीचे लग्न असल्यास भावाच्या उत्साहाला पारावार राहात नाही. मात्र कोकडी येथील गुरूदेव उमाजी टिकले (२५) हा भाऊ या बाबतीत अभागी ठरला. लहान बहिणीचे लग्न केवळ एक दिवसावर असताना गुरूदेवची प्राणज्योत मावळली. ज्या अंगणातून रविवारी बहिणीची डोली निघणार होती, त्याच अंगणातून गुरूदेवची अंत्ययात्रा काढण्याचा दुर्दैवी प्रसंग टिकले परिवारावर ओढवला. ही घटना शनिवारी (३०) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.गुरूदेवच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने तो मागील तीन वर्षांपासून मृत्यूशी झुंज देत होता. कौटुंबिक जबाबदारी व आरोग्याशी लढत त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्याच्या कुटुंबाने पै-पै जमा करून डायलेसिसवर गुरूदेवला जगविण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान ३१ मार्च रोजी त्याच्या लहान बहिणीचे लग्नकार्य होते. यामुळे गुरूदेवसह संपूर्ण कुटुंब आनंदात होते. आपल्या बहिणीचे हात पिवळे होताना बघण्याची आस गुरूदेवला होती. मात्र हे नियतीला कदाचित मान्य नसावे.गुरूदेवचे वडील बालवयातच वारले. वडिलांच्या मृत्यूनंतर स्वत:चे शिक्षण व कुटुंबाचे पालनपोषण ही दुहेरी कसरत गुरूदेवने पार पाडली होती. त्यामुळे कमी वयातच तो कुटुंबाचा आधार बनला होता. गुरूदेवच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्याला स्वत:चे मरण जवळ असल्याचे माहित होते, मात्र बहिणीच्या लग्नापर्यंत आपण जगू, अशी आशा तो बाळगून होता.गंभीर आजार असतानाही गुरूदेवचा आत्मविश्वास अजिबात कमी झाला नव्हता. त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होते. प्रत्येक महिन्याला आठ ते दहा वेळा डायलेसीस करावे लागत होते. त्याची आई, आजी, भाऊ, बहिण यांनी जीवाचे रान करून गुरूदेवला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. गुरूदेवचा जीवनसंघर्ष शनिवारी सकाळी संपला.‘लोकमत’ने मिळवून दिली मदतगुरूदेवची हलाखीची आर्थिक परिस्थिती व त्याच्या उपचारासाठी असलेली पैशाची गरज लक्षात घेऊन त्याला आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने लोकमतने २३ जानेवारी २०१८ रोजी बातमीही प्रकाशित केली होती. ‘उच्चशिक्षित गुरूदेवला उपचारासाठी गरीबी ठरतेय शाप’ या मथळ्याची बातमी प्रकाशित झाल्यानंतर काही दात्यांनी गुरूदेवला आर्थिक मदतही केली, मात्र ती मदत अपुरी ठरली.

टॅग्स :Deathमृत्यू