शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
2
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
3
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
4
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
5
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
6
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
7
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
8
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
9
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
10
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?
11
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
12
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
13
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
14
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
15
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी
16
IPL 2025 Orange Cap Race : जे विराटला जमणार नाही ते सूर्याला सहज शक्य होईल, पण...
17
मामाच्या नावाने हगवणेंनी स्वतःचे खिसे भरले; कस्पटेंकडून रुखवतासाठी १ लाखांचा चेक अन् ५० हजार घेतले
18
Shubman Gill: हार्दिकसोबत मतभेद झाल्याच्या चर्चांवर गिलने सोडले मौन; इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले...
19
IPL Qualifier 2: आतापर्यंत फक्त ४ फलंदाजांनी साधलाय 'शतकी' डाव!
20
बापरे! मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेने क्लाएंटसोबत लावलं स्वत:च्या नवऱ्याचं लग्न, घेतले ७ लाख

क्रीडा संकुलासाठी अतिक्रमण हटवावेच लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:01 IST

येथील लांझेडा भागातील प्रस्तावित क्रीडा संकुलाची ६.९६ हेक्टर जमीन वनविभागाने जिल्हा क्रीडा समितीकडे हस्तांतरित केली असली तरी त्या जागेपैकी जवळपास एक हेक्टर जागेवर नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. गेल्या अनेक वर्षात वनविभागाने त्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवली असून आता हे अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी वनविभागालाच अंगावर घ्यावी लागणार आहे.

ठळक मुद्देवनविभागाला घ्यावी लागणार जबाबदारी : अनेक वर्षांपासूनचे दुर्लक्ष अंगलट, संकुलाच्या बांधकामास होणार विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येथील लांझेडा भागातील प्रस्तावित क्रीडा संकुलाची ६.९६ हेक्टर जमीन वनविभागाने जिल्हा क्रीडा समितीकडे हस्तांतरित केली असली तरी त्या जागेपैकी जवळपास एक हेक्टर जागेवर नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. गेल्या अनेक वर्षात वनविभागाने त्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवली असून आता हे अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी वनविभागालाच अंगावर घ्यावी लागणार आहे. वनविभागाने सातबाऱ्याप्रमाणे पूर्ण जागा ताब्यात दिल्याशिवाय बांधकाम सुरू करणार नाही, असा पवित्रा क्रीडा समितीने घेतल्यामुळे क्रीडा संकुलाचे नियोजित बांधकाम रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी राज्य शासनाने २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. वनविभागाच्या लांझेडा येथील ६.९६ हेक्टर झुडूपी जंगलाच्या जागेची त्यासाठी निवड झाल्यानंतर वनविभागाच्या अनेक किचकट अटींची पूर्तता जिल्हा क्रीडा समितीने केली. वनविभागाच्या जागेच्या बदल्यात पर्यायी जागा म्हणून दुप्पट जागाही वनविभागाला देण्यात आली.याशिवाय वनविभागाच्या नियमानुसार वनीकरणासाठी क्रीडा समितीने १ कोटी २९ लाख ९९ हजार रुपये वनविभागाकडे भरले. मात्र क्रीडा समितीकडून सर्व अटींची पूर्तता करून घेणाºया वनविभागाने आपल्या जागेवर झालेले अतिक्रमण अनेक वर्षांपासून निमुटपणे कसे सहन केले? हा प्रश्न आता महत्वाचा ठरला आहे.लांझेडातील सध्याच्या जिल्हा प्रेक्षागार मैदानाच्याच जागेवर हे क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. अनेक वर्षांपासून त्याचा वापर खेळ किंवा इतर कार्यक्रमासाठी होत असला तरी ती जागा वनविभागाच्या नोंदीनुसार झुडूपी जंगल आहे. अनेक वर्षापूर्वी तत्कालीन स्टेडियम कमिटीने त्या जागेचे सपाटीकरण, भिंतीचे कुंपन, बसण्यासाठी स्टेअर केजची निर्मिती, २ बोअरवेल, चौकीदाराची खोली आदी कामे केली होती. कालांतराने ती जागा वनखात्याची असल्याचे निदर्शनास आल्यावर वन संवर्धन कायद्याअंतर्गत त्या जागेच्या मागणीचा प्रस्ताव क्रीडा विभागाकडून वन खात्याकडे पाठविला होता.अतिक्रमण हटविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशउपवनसंरक्षक गडचिरोली यांनी लांझेडा येथील ६.९६ हेक्टर जागा जिल्हा क्रीडा समितीकडे कागदोपत्री हस्तांतरित केली असली तरी त्या जागेवर असलेले जवळपास एक हेक्टरवरील अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी वनविभागाचीच असल्याचे जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट करत अतिक्रमण हटवून जागा ताब्यात देण्याचे निर्देश त्यांनी वनविभागाच्या अधिकाºयांना बैठकीत दिले.क्रीडा प्रतिभेची कुचंबना कधी दूर होणार?२०१४ पूर्वीच्या आघाडी सरकारच्या काळात राज्य शासाने प्रत्येक तालुका मुख्यालयी तालुका क्रीडा संकुल उभारण्यास मंजुरी देऊन प्रत्येकी १ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले होते. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत हे क्रीडा संकुल अजूनही उभारल्या गेलेले नाही. दरम्यान युती सरकारच्या काळात राज्य शासनाने तालुका क्रीडा संकुलाचे अनुदान १ कोटीवरून ५ कोटी तर जिल्हा क्रीडा संकुलाचे अनुदान ८ वरून १६ कोटी रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गडचिरोलीच्या क्रीडा संकुलासाठी १६ कोटी मिळणार होे. मात्र विशेष बाब म्हणून २४ कोटीच्या अनुदानाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. तरीही हे क्रीडा संकुल उभारणीच्या कामातील अडथळे दूर होत नसल्यामुळे जिल्ह्यातील क्रीडा प्रतिभेची कुचंबना होत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक