शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यालगतच्या जागेवर अतिक्रमण

By admin | Updated: May 23, 2017 00:46 IST

जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या चपराळा देवस्थानाकडे जातांना आष्टी ते चपराळा मार्गावर इल्लूर, ठाकरी, कुनघाडा माल येथील शेतकऱ्यांनी रस्त्यालगत ....

शेतकऱ्यांनी टाकली माती : जि. प. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष;बससेवेलाही अडचणलोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या चपराळा देवस्थानाकडे जातांना आष्टी ते चपराळा मार्गावर इल्लूर, ठाकरी, कुनघाडा माल येथील शेतकऱ्यांनी रस्त्यालगत असलेल्या शेतातील पाळ खोदून माती रस्त्यावर टाकून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ता अरूंद होऊन त्याची दुरवस्था झाली आहे. मात्र याकडे जि. प. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. आष्टी-चपराळा मार्गे असंख्य भाविक देवदर्शनासाठी चपराळा येथे जातात. या रस्त्यालगत असलेल्या शेताचा पूर्वीचा धुरा रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूला ३० फुट होता. ६० फुटाचा हा रस्ता होता परंतु शेतकऱ्यांनी पाळ बांधत असताना धुरा तोडून सरळ ती पाळ रस्त्यापर्यंत भिडवली. आणि दोन्ही बाजूंनी रस्त्याची पूर्ण जागा गिळंकृत केली. सध्या २५ फुटाचा रस्ता शिल्लक राहिला असून दोन चारचाकी वाहन विरूद्ध दिशेने आल्यास वाहन ओलांडणे कठिण झाले आहे. काही शेतकऱ्यांनी पाळ खोदून सरळ माती रस्त्यावर टाकल्याने पुन्हा हा रस्ता अरूंद झाला आहे. तर ठाकरी येथे एका शेतकऱ्याने रस्त्याच्या जागेवर तारेचे कुंपन केलेले आहे. काही शेतकऱ्यांनी रस्त्याच्या जागेवर कापसाच्या ढिगांसाठी वापर केला आहे. मात्र याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. चपराळा येथे महाशिवरात्रीला दरवर्षी मोठी यात्रा भरत असते. असंख्य भाविकांना गर्दीमुळे वाहने चालविताना त्रास सहन करावा लागतो. मात्र याकडेही शासन व प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. बांधकाम विभागाचे अभियंता या देवस्थानकडे कधीच फिरकलेच नसावे, असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. अतिक्रमणामुळे रस्ता अरूंद झाल्याने एसटी महामंडळाची बसही पावसाळ्यात बंद करावी लागते. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थी व नागरिकांना तालुका व जिल्हा मुख्यालयात ये- जा करताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात या मार्गाने चालत अथवा खासगी वाहनाने येण्याची वेळ येते. शासन व जिल्हा प्रशासनाने या गंभीर बाबीची तत्काळ दखल घेऊन जि. प. बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना त्वरित कारवाई करण्याच्या सूचना द्याव्या व रस्त्यालगत असलेले अतिक्रमण हटवून या रस्त्याचे रूंदीकरण करावे, अशी मागणी हनुमान मंदिर प्रशांत धाम चपराळाचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर पंदिलवार यांनी केली आहे.