शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षित वनजमिनीवरील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 22:20 IST

देसाईगंज वन परिक्षेत्रांतर्गत शंकरपूर उपक्षेत्रातील बोळधा नियतक्षेत्राच्या शासकीय संरक्षित वनजमिनीवर काही नागरिकांनी अतिक्रमण करून शेती कसणे सुरू केले होते.

ठळक मुद्देशेतात जेसीबी चालविली : बोळधा येथे वन विभागाची कारवाई

आॅनलाईन लोकमतकोरेगाव/चोप : देसाईगंज वन परिक्षेत्रांतर्गत शंकरपूर उपक्षेत्रातील बोळधा नियतक्षेत्राच्या शासकीय संरक्षित वनजमिनीवर काही नागरिकांनी अतिक्रमण करून शेती कसणे सुरू केले होते. संबंधित शेतकऱ्यांना नोटीस बजावूनही अतिक्रमण कायमच राहिले. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस संरक्षणात जेसीबीच्या सहाय्याने संबंधित अतिक्रमीत जागेवरील अतिक्रमण हटविले. सदर कारवाई शनिवारी सायंकाळच्या सुमारास वडसा वन विभागचे सहायक वनसंरक्षक बी. व्ही. कांबळे व वन परिक्षेत्राधिकारी नरेंद्र चांदेवार यांनी पोलीस बंदोबस्तात पार पाडली.बोळधा येथील सर्वे नंबर ४५६/१ मधील ३३.८२ हेक्टरपैकी १.७९१ हेक्टर इतक्या संरक्षित वन जमिनीवर बोळधा येथील रतीराम भिवा गायकवाड, मुरलीधर धर्मा मेश्राम, पुंडलिक तिमा गायकवाड, विश्वनाथ तुकाराम गायकवाड व गोपाल विनायक सुकारे या पाच शेतकºयांनी अतिक्रमण घेऊन पीक घेणे सुरू केले होते. शासन निर्णयानुसार पाचही शेतकºयांनी शेती कसणे सुरू केले. दरम्यान वन विभागांनी या शेतकºयांना अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस बजाविली. मात्र या नोटीसकडे दुर्लक्ष केल्याने वनाधिकाºयांनी पोलीस संरक्षणात जेसीबीच्या सहाय्याने या संरक्षित वन जमिनीवरील अतिक्रमण हटविले. या कारवाईमुळे जंगलात अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.संरक्षित वन जमिनीवर अतिक्रमण झाले असल्याच्या मुद्यावर वनाधिकाºयांनी ठोस भूमिका घेतली. त्यानंतर पुढाकार घेऊन संरक्षित वनाची जागा आपल्या ताब्यात घेतली व त्यानंतर या ठिकाणी नाली खोदण्यात आली.जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्याची कारवाई सहायक वनसंरक्षक बी. व्ही. कांबळे, वन परिक्षेत्राधिकारी एन. जी. चांदेवार, जांभुळे, क्षेत्र सहायक मेनेवार, माडावार, ठाकरे, कोसमसिले, वनपाल वंजारी, कुंभरे यांच्यासह वनरक्षक, वनमजूर आदींनी केली. सदर अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान देसाईगंज पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांनी बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडली. बहुप्रतिक्षेनंतर अतिक्रमण काढण्यात आले.स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी यापूर्वी आंदोलनबोळधा हे गाव देसाईगंज तालुक्यात वन जमीन अतिक्रमणाच्या जास्तीत जास्त भागाने व्यापला आहे. पाच वर्षांपूर्वी या अतिक्रमणधारकांच्या वाढत्या हिंमतीमुळे येथे मृतदेह पुरण्यासाठी जागा शिल्लक राहिली नव्हती. त्यामुळे चक्क ग्रामपंचायत कार्यालयात मृतदेह नेऊन मशानभूमीची जागा मोकळी करा, नाही तर मृतदेह गावात पुरण्यासाठी परवानगी द्या, या मागणीकरिता आंदोलन झाले होते. या आंदोलनानंतर तत्कालीन पोलीस निरिक्षक दीपक निकम यांनी तहसीलदार, भूमिअभिलेख अधिकारी यांना पाचारण करून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई त्यावेळी केली होती.