शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

वनहक्काच्या जागेवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:56 IST

आरमोरी तालुक्याच्या सिर्सी, कुकडी, नरोटी (चक), विहीरगाव, मोहटोला येथील शेतकऱ्यांना महसूल व वनजमीन वनहक्क प्राप्त असून या जमिनीवर अवैैध अतिक्रमण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकारवाईची मागणी : पेसा क्षेत्रातील जमीन परत मागितली;राज्यपालांना पाठविले पत्र

आॅनलाईन लोकमतवैरागड : आरमोरी तालुक्याच्या सिर्सी, कुकडी, नरोटी (चक), विहीरगाव, मोहटोला येथील शेतकऱ्यांना महसूल व वनजमीन वनहक्क प्राप्त असून या जमिनीवर अवैैध अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अवैैध अतिक्रमण हटवून कुकडी, सिर्सी वनहक्काच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करून पेसाची जागा परत करावी, अशी मागणी पेसा गटग्रामसभा नरोटी चक यांनी राज्यपालांकडे केली आहे.विशेष ग्रामसभा नरोटी चक यांनी या पत्रात म्हटले आहे की, सर्वे नं. २४९, २६०, २६२, २६४, २६४/२, २६५, २६६, २५०, २५१, २५३, २४६, २९९ यावर नव्याने जानेवारी २०१६ मध्ये अतिक्रमण करणारे सतीश गजभिये व इतर २२ व्यक्तींनी येथील जंगलातील १०० एकर जागेवरील अवैैध वृक्षतोड करून वरील सर्वे नंबरवर नव्याने अतिक्रम केले. त्यांच्या या कृतीमुळे जंगलाच्या जैैवविविधतेचे नुकसान झाले आहे. वनहक्क कायदा आणि जैैवविविधता कायद्याचा त्यांनी भंग केला आहे. नियम डावलून येथील तलाठी डी. बी. रामटेके, बारसागडे, खोब्रागडे, मंडळ अधिकारी घरत यांनी नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना आदिवासी खातेदारांची शेतजमीन बेदखल करून संबंधित अतिक्रमणधारकांना मदत केली. पेसा कायद्यांतर्गत आदिवासी भूमिहीन यांनाच जमीन देता येते. परंतु नरोटी चक या क्षेत्रात एकाच कुटुंबात ४५ एकर जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. आदिवासी अनुसूचित क्षेत्रातील मोहटोला, कुकडी, विहीरगाव, नरोटी चक, नरोटी माल जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी सरपंच विजया भुसारी, उपसरपंच विश्वेश्वर दर्राे, विश्वनाथ हलामी, शेषराव उसेंडी, पुरूषोत्तम किरंगे, दिगांबर दुर्गे, उमाजी भुसारी, शालिकराम मडावी, ममीता म्हशाखेत्री, घनश्याम फुकटे यांनी राज्यपालांकडे केली आहे. वन विभागाची आठ लाख हेक्टर वनजमीन महसूल विभागाच्या ताब्यात आहे. परंतु महसुलाची लॉबी वन विभागाकवर भारी पडत असल्याने हा प्रश्न निकाली लागला नाही. अंदाजपत्रकीय अधिवेशनात या विषयावर तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. वन विभागाकडे जमीन परत झाल्यास अनेकांचे अतिक्रमण मोडीत निघणार आहे.बाहेरच्या लोकांचे अतिक्रमणनागपूर जिल्ह्यातील मूळचे रहिवासी असलेल्या अनेक लोकांच्या नावे सर्वे नंबर आहेत. तसेच काही कर्मचाऱ्यांच्या नावे वनहक्क करण्यात आले आहे. आदिवासी भूधारक जमीन हस्तांतरणास मनाई असल्याचा उल्लेख असतानाही आदिवासी लोकांना धमकावून बळजबरीने सर्वे नंबरवर वहिवाट सुरू आहे.