लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज नगर परिषदेने बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्याची मोहीम बुधवारपासून सुरू केली. सदर मोहीम गुरूवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होती.शहरातील फवारा चौक तसेच सराफा लाईनमध्ये अतिक्रमण वाढले आहे. अतिक्रमणामुळे रस्ते अरूंद होऊन पार्र्किंग व वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. फवारा चौकातील अतिक्रमण हटविण्याविषयी नगर परिषदेकडे तक्रारी वाढल्या होत्या. त्यानुसार नगर परिषदेने कारवाई करीत फवारा चौक व सराफा लाईनमधील अतिक्रमण काढले. दुकानदारांनी रस्त्यावर पक्के बांधकाम केले होते. अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाल्यानंतर नगर परिषदेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न काही नागरिकांनी केला. मात्र नगर परिषदेचे अधिकाऱ्यांनी या दबावाला न जुमानता अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. आचारसंहिता लागू असेपर्यंत अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरूच राहिल, अशी माहिती नगर परिषदेमार्फत देण्यात आली.
अतिक्रमण हटाव मोहीम दुसऱ्याही दिवशी सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 23:53 IST
देसाईगंज नगर परिषदेने बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्याची मोहीम बुधवारपासून सुरू केली. सदर मोहीम गुरूवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होती. शहरातील फवारा चौक तसेच सराफा लाईनमध्ये अतिक्रमण वाढले आहे.
अतिक्रमण हटाव मोहीम दुसऱ्याही दिवशी सुरूच
ठळक मुद्देआचारसंहितेपर्यंत अंमलबजावणी