गडचिराेली : जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या शहराच्या गाेकुलनगर परिसरातील देवापूर रिठ सर्वे नं. ७८ मधील बाेडीच्या शासकीय जागेवर नागरिकांनी अतिक्रमण करून कच्च्या झाेपड्या उभारल्या हाेत्या. याबाबत तक्रारीची दखल घेऊन गडचिराेलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी तिनही विभागाच्या पथकाला घेऊन येथील झाेपड्या पाडल्या. साहित्य जमा करून अतिक्रमण हटविण्याची तडकाफडकी कारवाई केली.
गाेकुलनगर वाॅर्ड क्रमांक २३ देवापूर रिठ सर्वे नं. ७८ मधील शासकीय तलावामध्ये नागरिकांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणीवजा तक्रार वाॅर्डातील काही नागरिकांनी महसूल, नगर परिषद प्रशासनाकडे केली हाेती. तहसीलदारांना या संदर्भात निवेदन देण्यात आले हाेते. या शासकीय जागेत कच्च्या झाेपड्या उभारून अतिक्रमण करणारे लाेकांकडून अनेकदा गाेंधळ घातला जाताे. किरकाेळ भांडणे हाेऊ शकतात. गाेकुलनगरातील सामाजिक वातावरण याेग्य राहण्यासाठी येथील अतिक्रमण काढावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली हाेती. त्यानंतर तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी, विभागप्रमुख तसेच सिंचन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाेबत चर्चा केली. दरम्यान अतिक्रमण हटाव माेहीम राबविण्याचा निर्णय तिनही विभागाच्या वतीने घेण्यात आला. दरम्यान मंगळवारी तहसीलदार महेंद्र गणवीर यांच्या पुढाकाराने अतिक्रमण हटाव माेहीम राबविण्यात आली.
यावेळी नायब तहसीलदार एन. बी. दांडेकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहाेड, नगर रचनाकार साळी, गिरीष मैंद, पाेलीस उपनिरीक्षक स्वप्निल गाेपाले, जलसंधारण विभागाचे उपअभियंता आर. सी. गजभे, मंडळ अधिकारी एस. एस. बारसागडे, जलसंधारण विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी विनाेद दशमुखे, आदी उपस्थित हाेते. चाेख पाेलीस बंदाेबस्तात कारवाई करण्यात आली.
बाॅक्स......
जागेची माेजणी हाेणारच- तहसीलदार गणवीर
गाेकुलनगर लगतच्या देवापूर रिठ सर्वे नं. ७८ मध्ये तलाव आहे. हा तलाव जलसंधारण विभागाच्या अखत्यारीत आहे. मात्र या तलावाची जागा नगर परिषदेला हस्तांतरित करून ती जागा विकसित करण्याचे नियाेजन आहे. यासाठीची प्रक्रीया हाती घेण्यात आली आहे. सदर तलावाची रेकार्डनुसार किती जागा शिल्लक आहे. हे पाहण्यासाठी सदर जागेची भूमिअभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून माेजणी करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत या जागेची माेजणी करून सीमांकन करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी लाेकमतशी बाेलताना दिली.