लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : नगर पंचायतीने कारवाई करीत मुख्य चौकातील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करून दिला आहे.हेमलकसाकडून भामरागड शहरात प्रवेश करतेवेळी मुख्य चौक आहे. याठिकाणी ग्राहकांची वर्दळ राहत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा पानठेलेधारकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून दुकाने थाटली होती. अतिक्रमणामुळे अडथळा निर्माण होत होता. ही बाब लक्षात घेऊन नगर पंचायतीने चौकातील अतिक्रमण हटविले आहे. अतिक्रमण हटवितेवेळी पोलिसांची मदत घेण्यात आली होती. दिवसभर अतिक्रमण हटाव मोहीम चालली. दुकानदारांनीसुद्धा सहकार्य केल्याने कोणतीही अनुचित घटना न घडता अतिक्रमण हटले. रस्त्यावर अतिक्रमण करून थाटण्यात आलेली दुकाने जेसीबीच्या सहय्याने हटविण्यात आली.काही दुकानदारांनी अगोदरच दुकाने हटविली असल्याने त्यांचे कोणतेही नुकसान झाले नाही. अतिक्रमण हटविल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने रस्ता मोकळा करण्यात आला.
भामरागडातील अतिक्रमण हटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 23:52 IST
नगर पंचायतीने कारवाई करीत मुख्य चौकातील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करून दिला आहे. हेमलकसाकडून भामरागड शहरात प्रवेश करतेवेळी मुख्य चौक आहे.
भामरागडातील अतिक्रमण हटले
ठळक मुद्देनगर पंचायतीची कारवाई : मुख्य चौकातील दुकाने