शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राेजगारासह नाेकऱ्या देणारे हात निर्माण हाेतील: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

By दिलीप दहेलकर | Updated: November 15, 2023 20:27 IST

महाराष्ट्र शासन व टाटा कन्सलटंशी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील एमआयडीसी मार्गावर इनव्हेंशन, इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर

गडचिराेली :

महाराष्ट्र शासन व टाटा कन्सलटंशी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील एमआयडीसी मार्गावर इनव्हेंशन, इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर उभारण्यात आले असून या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी तब्बल ४ हजार ८०० बेराेजगार तरूणांना काैशल्यावर आधारित प्रशिक्षण मिळणार आहे. या प्रकल्पाद्वारे राेजगार निर्मिती हाेईल, शिवाय नाेकऱ्या देणारे उद्याेजक तयार हाेतील, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

मुख्यमंत्री शिंदे हे बुधवारला गडचिराेली जिल्ह्याच्या दाैऱ्यावर आले हाेते. दरम्यान त्यांनी सायंकाळच्या सुमारास गाेंडवाना विद्यापीठालगत एमआयडीसी मार्गावर उभारण्यात आलेल्या काैशल्य प्रशिक्षण केंद्राचे लाेकार्पण केले. यावेळी ते बाेलत हाेते. याप्रसंगी प्रामुख्याने गडचिराेली परीक्षेत्राचे पाेलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मिना, पाेलिस अधीक्षक निलाेत्पल, गाेंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डाॅ. श्रीराम कावळे यांच्यासह टाटा कन्सलटंशीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते. 

याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर प्रकल्पातील प्रत्येक मशीनची पाहणी केली. ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रशिक्षण घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज लॅब तयार करण्यात आल्या आहेत. माेठमाेठ्या मशीन येथे लावण्यात आल्या असून येथे अनेक वस्तू तयार हाेणार आहेत. काेट्यवधी रूपये खर्च करून राज्य शासन व टाटा कन्सलटंशीच्या संयुक्त विद्यमाने काैशल्यावर आधारित अत्याधुनिक प्रशिक्षण देणारा हा प्रकल्प येथे उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक तरूणांना प्रशिक्षित हाेउन राेजगार उपलब्ध हाेईल, असा आशावाद ना. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. 

दुर्गम गडचिराेलीत माेठी अचिव्हमेंट

विद्यमान राज्य सरकार विकासाच्या दृष्टीने गतिशील पाउल टाकत आहे. गडचिराेली जिल्ह्यात मायनिंग उद्याेग, स्टील प्लॅंटची उभारणी हाेत असून यातून हजाराे युवकांना राेजगार मिळणार आहे. त्यात आता गडचिराेली जिल्हा मुख्यालयी इनव्हेंशन, इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर उभारण्यात आले असून येथून काैशल्यपूर्ण व क्षमताधिष्ठीत मनुष्यबळ निर्माण हाेणार आहे. दुर्गम गडचिराेली जिल्ह्यातील ही माेठी अचिव्हमेंट आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.