शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बदलीनंतरही कर्मचारी ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेअंतर्गत सर्वच पदांच्या बदल्या मे महिन्यात केल्या जातात. मात्र यावर्षी कोरोनामुळे या बदल्या जूनपर्यंत लांबल्या. उशिरा का होईना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या पार पडल्या. १० ते १५ वर्षांपासून नक्षलग्रस्त व दुर्गम भागात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सामान्य क्षेत्रात नोकरी करण्याची तसेच कुटुंबाजवळ राहण्याची संधी उपलब्ध झाली होती. त्यामुळे दुर्गम भागातून बदली झालेले आरोग्य कर्मचारी आनंदी होते.

ठळक मुद्देतीन महिने उलटले : दुर्गम भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जून महिन्यात ७० आरोग्य सेवक, ९० आरोग्य सेविका आणि १५ आरोग्य सहायिकांच्या बदल्या करण्यात आल्या. बदल्या होऊन आता तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना भारमुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे दुर्गम भागात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा हिरमोड होत आहे.जिल्हा परिषदेअंतर्गत सर्वच पदांच्या बदल्या मे महिन्यात केल्या जातात. मात्र यावर्षी कोरोनामुळे या बदल्या जूनपर्यंत लांबल्या. उशिरा का होईना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या पार पडल्या. १० ते १५ वर्षांपासून नक्षलग्रस्त व दुर्गम भागात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सामान्य क्षेत्रात नोकरी करण्याची तसेच कुटुंबाजवळ राहण्याची संधी उपलब्ध झाली होती. त्यामुळे दुर्गम भागातून बदली झालेले आरोग्य कर्मचारी आनंदी होते. मात्र बदलीला तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भारमुक्त केले नाही. आरोग्य विभागात आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे जोपर्यंत नवीन कर्मचारी रूजू होत नाही, तोपर्यंत कार्यरत कर्मचाऱ्यांना वैद्यकीय अधिकारी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. कार्यरत कर्मचाऱ्याला भारमुक्त केल्यास दुसरा कर्मचारी रूजू न झाल्यास आरोग्य यंत्रणा कोलमडेल, अशी भीती वैद्यकीय अधिकाऱ्यांना वाटत आहे.सामान्य भागातून दुर्गम भागात बदली झालेले कर्मचारी विविध कारणे सांगून ज्या दुर्गम भागात बदली झाली, त्या ठिकाणी रूजू होण्यास टाळाटाळ करीत आहेत. सामान्य भागातील कर्मचारी दुर्गम भागात रूजू झाले नसल्याने दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया रखडली आहे. सर्वच कर्मचाऱ्यांना बदलीचे आदेश प्राप्त झाले आहेत. मात्र भारमुक्त केले जात नसल्याने दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी खितपत पडून राहावे लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना त्याच भागात सेवा द्यावी लागत आहे.सामान्य भागातील कर्मचाऱ्यांची मनमानीकोणत्याही कर्मचाऱ्यांची तर दर तीन वर्षांनी बदली होणे आवश्यक आहे. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांची कधीच तीन वर्षांच्या अंतराने नियमित बदली होत नाही. सामान्य भागात कार्यरत असलेले कर्मचारी, अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आपली बदली दुर्गम भागात होणार नाही, यासाठी पुरेपूर प्रयत्न करतात. यात ते यशस्वीही होत असल्याने याचा फटका दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना बसत आहे. काही कर्मचारी १० ते १५ वर्षांपासून दुर्गम भागात सेवा देत आहेत. सामान्य भागातील कर्मचारी मात्र जुगाड लावून दुर्गम भागात बदली टाळत असल्यामुळे कर्मचाºयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :TransferबदलीHealthआरोग्य