शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

रिक्त पदाचा भारच जिल्ह्यावर लयभारी

By admin | Updated: September 16, 2015 01:42 IST

गडचिरोली हा राज्यातील मागास व नक्षलग्रस्त जिल्हा असून या भागात विकास प्रक्रिया गतिमान करण्यासाठी राज्य शासनातर्फे सातत्याने प्रयत्न केले जात आहे.

७२ आस्थापना प्रभारींच्या भरवशावर : वर्ग १ ची १७६, वर्ग २ ची १५६, वर्ग ३ ची १ हजार ६९०, वर्ग ४ ची ३९१ पदे रिक्त गडचिरोली : गडचिरोली हा राज्यातील मागास व नक्षलग्रस्त जिल्हा असून या भागात विकास प्रक्रिया गतिमान करण्यासाठी राज्य शासनातर्फे सातत्याने प्रयत्न केले जात आहे. मात्र विकास प्रक्रिया राबविण्यासाठी लागणारी शासकीय यंत्रणा रिक्त पदाच्या भारामुळे दुबळी झाली आहे. अनेक कार्यालयांमध्ये रिक्त पदे अधिक असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांवर त्यांचा भार देण्यात आला आहे. त्यामुळे जनतेचे काम मार्गी लावण्यात प्रचंड अडचणी निर्माण होत आहे. मागील १० वर्षांपासून जिल्ह्यात ही परिस्थिती असून वर्ग १ च्या अधिकाऱ्यांची जवळजवळ ३५.६३ म्हणजे १७६ पदे रिक्त आहेत. त्यामुळे यांचा पदभार वर्ग २ च्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. रिक्त पदांच्या भारामुळे जिल्ह्यातील विकास प्रक्रियेवर कमालीचा परिणाम झाल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त पदाबाबत शासन स्वतंत्र धोरण निश्चित करेल, असे नोव्हेंबर २०१४ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे म्हटले होते. परंतु अजुनपर्यंत राज्य शासनाने याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेत रिक्त पदच लयभारी झाले आहे.उपजिल्हाधिकाऱ्यांचाही दुष्काळचजिल्हाधिकारी कार्यालयासह सहा उपविभागात उपजिल्हाधिकाऱ्यांची चार पदे रिक्त आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. याशिवाय उपजिल्हाधिकारी निवडणूक, उपजिल्हाधिकारी भूसंपादन, उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांचे पद रिक्त आहे. यांचा पदभार कार्यरत उपजिल्हाधिकाऱ्यांवरच देण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहणारे सुनील गाडे यांच्याकडे निवडणूक विभाग व भूसंपादन विभागाचे काम सोपविण्यात आले आहे. तर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा प्रभार अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांच्याकडे देण्यात आला आहे. आव्हाड गडचिरोलीत कामकाज सांभाळत असल्याने अहेरी उपविभाग अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याविना आहे.गडचिरोली जिल्ह्यात २ हजार ४१३ रिक्त पदेशासनाच्या विविध आस्थापनांमध्ये असून जिल्ह्यात अ, ब, क, ड गटाची २३ हजार ६२३ पदे मंजूर आहे. त्यापैकी २१ हजार २१० पदे भरलेली असून २ हजार ४१३ पदे रिक्त आहे. अ गटाची ४९४ पैकी ३१८ पदे भरलेली असून १७६ पदे रिक्त आहे. म्हणजे ३५.६३ टक्के पद रिक्त आहे. ब गटाची १ हजार ११ पदे मंजूर असून ८५५ पदे भरलेली आहे. १५६ पदे रिक्त आहे. क गटाची १९ हजार २०२ पदे मंजूर असून १७ हजार ५१२ पदे भरलेली आहे. १ हजार ६९० पदे रिक्त आहे. ड गटाची २ हजार ९१६ पदे मंजूर असून २ हजार ५२५ पदे भरलेली आहे. ३९१ पदे रिक्त आहे. जिल्ह्यात वर्ग १ पासून वर्ग ४ पर्यंत शासनाच्या विविध आस्थापनेत २४१३ कर्मचारी, अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.