शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीच्या विरोधात एल्गार

By admin | Updated: January 10, 2017 00:52 IST

केंद्र सरकारने केलेल्या नोटबंदीचा निषेध करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महिला काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी सोमवारी जिल्हाभर रस्त्यावर उतरलेत

राकाँ व महिला काँग्रेस रस्त्यावर : जिल्हाभर तीव्र आंदोलन करून सरकारचा केला निषेधगडचिरोली : केंद्र सरकारने केलेल्या नोटबंदीचा निषेध करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महिला काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी सोमवारी जिल्हाभर रस्त्यावर उतरलेत व त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५०० व १००० च्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला. या निर्णयामुळे देशातला शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतमालाचे भाव घसरत आहे. ५० दिवसानंतरही बँकांची परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. सर्वसामान्य माणूस रांगेत आपलेच पैसे मिळविण्यासाठी उभा आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या महिला जिल्हा आघाडीने केला.अहेरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. शेकडो समर्थक राजवाडा ते विश्वेश्वरराव चौक पर्यंत चालत गेले व या निर्णयाचा जोरदार निषेध करण्यात आला. त्यानंतर अहेरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. गडचिरोली येथे इंदिरा गांधी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, कार्यकारी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी राकाँच्या महिला जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यपवार, सविता कावळे, जि.प. सभापती विश्वास भोवते, जयंत येलमुले, श्रीनिवास गोडसेलवार, निशांत पापडकर, दादाजी चुधरी, अजय कुंभारे, लिलाधर भरडकर, ऋषीकांत पापडकर, जगन जांभुळकर, हरिदास गेडाम, विवेक बाबनवाडे आदीसह राकाँचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी सुरेश पोरेड्डीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटबंदीचा निर्णय पूर्णत: फसला आहे. गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्र व संपूर्ण देशात अद्यापही चलन व्यवस्था सुधारली नाही. परिणामी बँका व एटीएममध्ये सर्वसामान्यांच्या रांगा कायमच आहेत. नोटबंदीमुळे कुठलाही फायदा झाला नाही, असा आरोप पोरेड्डीवार यांनी माध्यमांशी बोलताना केला. निदर्शने आटोपल्यानंतर राकाँचे पदाधिकारी व कार्यकर्ते धानोरा मार्गावरील तहसील कार्यालयात पोहोचले. तेथे तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर केले. केंद्र व राज्य सरकारने नोटबंदीनंतरची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निवेदनात म्हटले आहे. काँग्रेस, राकाँच्या आंदोलनाने जिल्हा दणाणलातहसीलदार व एसडीओंमार्फत शासनाला निवेदन : एटापल्ली, सिरोंचा, आरमोरी, कुरखेडा, चामोर्शी, अहेरीत धरणेगडचिरोली : केंद्र शासनाने चलनातील ५०० व १००० रूपयांच्या जुन्या नोटा बाद केल्यानंतर जनसामान्यांची झालेली गैरसोय व त्यांना झालेल्या त्रासाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने जिल्हाभर जनआक्रोश आंदोलन सोमवारी करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारविरोधातील घोषणांनी संपूर्ण जिल्हा यावेळी दणाणला. एटापल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एटापल्ली येथे केंद्र सरकारच्या नोटबंदी विरोधात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देताना दौलत दहागावकर, ऋषीकांत पापडकर, प्रशांत कोकुलवार, मिथून जोशी, प्रसाद नामेवार, ओमकार मोहुर्ले, वैैभव आत्राम, पूजलवार, बालाजी आत्राम, संदीप जोशी, राजू नरोटे, जि. प. सदस्य ग्यानकुमारी कौशी, प्रा. पत्तीवार, पापा पुण्यमूर्तीवार, नाडमवार, बंटी आसुटकर, रायुकाँ तालुका युवा अध्यक्ष अभिलाष रेड्डी उपस्थित होते. सिरोंचा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या नोटबंदी निर्णयाचा निषेध करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांमार्फत विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देताना रूद्रशेट्टी कोंडय्या, मल्लीकार्जुन आकुला, भंडारी समय्या, नागेश्वर गागापूरपू, अ‍ॅड. फिरोज खान, क्रिष्णकुमार चोक्कमवार, सत्यनाराय चिलकामारी, रवीकुमार रालाबंडी, विजय रंगुवार, रमजान खान, मधुकार कोल्लुरी, अजय कळणे, अ‍ॅड. तिरूपती कोंडागोर्ला, अशोक कासर्लावार, महेश बियप्पू, रूपेश संगेम, नागेश पेदापेल्ली, सदानंद दागम, विनोद मंडा, संगेम लक्ष्मीनारायण, मधुकर दागम, शिवाजी शिंदे, श्रीनिवास कुंदारपू, मंजूषा चोकमवार, प्रशांत गादम, महेश गादम, रामू दुमला, श्याम दुलम, शकूर राणा, जुगनू शेख, वैैकुंठम कंबागोनी, प्रवीण परकाला, व्यंकटेश्वर कंबागोनी, दाया रमेश, कुडमेथे, समय्या, कटकू कोंडय्या, नीलम रामकुष्टू, कुंदारपू गट्टू, गणेश बोदनवार, मिसरी सुधाकर, गुडीमेटला नागरेड्डी, कृपाकर मेचनेनी, यदगिरी मेचनेनी, मनोहर चेडे, भरत मडावी, वंगा मडावी, क्रिष्णा तलांडी, चंदू पेद्दापेल्ली, हेमंत लाटकरी, सूरज दासरी, प्रशांत आलकटी, प्रवीण दागम, शैंलेंद्र मुत्याला, प्रवीण मारगोनी, शिवाजी झाडी, चंदू पेंड्याला उपस्थित होते. आरमोरी - राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका शाखेच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर विविध आठ मागण्यांचे निवेदन पंतप्रधानांना तहसीलदारांमार्फत पाठविण्यात आले. या निवेदनात ५० दिवसांची मुदत संपुनही परिस्थिती बदलली नाही. त्यामुळे बँका व एटीएममधून पैैसे काढण्यावरील निर्बंध हटवावे, नोटबंदीमुळे बँकेच्या रांगेत उभे राहून मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३० लाख रूपये नुकसान भरपाई द्यावी, नोटबंदीमुळे नागरिकांनी बँकेत जमा केलेल्या रकमेवर १८ टक्के व्याज देण्यात यावे, जमा केलेले काळेधन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रति शेतकरी ५० हजार रूपये जमा करावे, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, धानाला प्रतिक्विंटल ३ हजार ५०० रूपये धाव द्यावा, छोटे उद्योजक व दुकानदारांना इनकम टॅक्स व सेलटॅक्समध्ये सुट द्यावी, आरमोरी ते वडसा या राष्ट्रीय महामार्गाची तत्काळ दुरूस्ती करावी, ५० दिवसांत जमा झालेल्या काळ्या पैशाचा जनतेला तपशील द्यावा आदी मागण्यांचा समावेश होता. निवेदन देताना राकाँ तालुकाध्यक्ष संदीप ठाकूर, शहर अध्यक्ष अमिन लालानी, महेश राऊत, ऋषी सहारे, सदाशिव भांडेकर, घनश्याम जांभुळकर, हेमराज ताडाम, शालिकराम पत्रे, अशोक सुरपाम, देवेंद्र सोनकुसरे, गजानन पकाडे, आकाश सेलोकर, मिलींद खोब्रागडे, आसिफ शेख, संजय धोटे, पवन सोरते, दिलीप घोडाम, सुनील मडावी, सोपान गेडाम, वसंत गेडाम, सुधीर दोनाडकर, खेमेश्वर मोहुर्ले, पवन वनमाळी उपस्थित होते. कुरखेडा - कुरखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देताना राकाँचे दादाजी प्रधान, जिल्हा सरचिटणीस अयुब खान, युनूस शेख, किशोर तलमले, गीतेश जांभुळे, टेटू नाकाडे, कैैलास रामचंदानी, भाष्कर हलामी, जितेंद्र वालदे, वच्छला केरामी, अर्चना वालदे, ताना मानकर, पुरूषोत्तम गेडाम, पुरूषोत्तम मडावी, अमरसिंग खडाधार, संजय कोचे, दीपक बागडे, पंकज मेश्राम, पुनेश वालदे, प्रवीण तोडसाम, देविदास मडावी, सुलोचना मडावी व कार्यकर्ते उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)महिला काँग्रेस कमिटीने केला थाळीनादअखिल भारतीय महिला काँग्रेसच्या गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या नोटबंदी विरोधात गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकात सोमवारी थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला काँग्रेसच्या गडचिरोली तालुका महासचिव दर्शना लोणारे, आरमोरीच्या तालुकाध्यक्ष मंगला कोवे, धानोराच्या पं.स. सभापती कल्पना वड्डे, कुरखेडाच्या तालुकाध्यक्ष तथा नगर पंचायतीच्या उपाध्यक्ष जयश्री धाबेकर, पं.स. सदस्य गीता धाबेकर, शहर महासचिव मंजू आत्राम, दर्शना मेश्राम, आशा भारती, मंदा तुरे, ज्योती गव्हाणे, आरती कंगाले, वर्षा गुलदेवकर, निशा बोदेले, गीता वाळके, संगीता सोनुले, सुनंदा राऊत, पुष्पा ब्राह्मणवाडे, कवीता निकुरे, पौर्णिमा भडके, शुभांगी मोटघरे, दीपा माळवणकर, माधुरी कुसराम, सपना गलगट आदी कार्यकर्त्या उपस्थित होत्या. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीधोरणाविरोधात भाषणातून रोष व्यक्त केला. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र शब्दात निषेध केला. भाजप सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नोटबंदीनंतर चलन व्यवस्था सुधारून परिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या कामात केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले आहेत, असा आरोप भावना वानखेडे यांनी यावेळी केला.