गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा-कमलापूर वीज उपकेंद्रात गेल्या पाच वर्षापासून एकाच विद्युत कर्मचारी कार्यरत आहे. या वीज उपकेंद्रांतर्गत गुड्डीगुड्डमपासून ते राजाराम-छल्लेवाडापर्यंतच्या २० गावांचा समावेश आहे. पुरेशा वीज कर्मचाऱ्यांअभावी या उपकेंद्राच्या हद्दीतील अनेक गावातील नागरिकांना दुरूस्तीअभावी अंधारात रात्र काढावी लागते. सध्या उन्हाळ्याचे दिवस तापमानात प्रचंड वाढ होत आहे. जिमलगट्टा कमलापूर भागात सततच्या विजेच्या लंपडावामुळे लघू उद्योजग व नागरिक हैराण झाले आहे. एकच विद्युत कर्मचारी असल्याने वीज दुरूस्तीच्या कामात प्रचंड दिरंगाई होत असते. यापूर्वी या वीज उपकेंद्रांतर्गत गुड्डीगुडमपासून राजाराम छल्लेवाडापर्यंत तीन विद्युत कर्मचारी कार्यरत होते. मात्र काही वर्षांपूर्वी दोन कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली झाली. तेव्हापासून २० गावांसाठी एकच विद्युत कर्मचारी कार्यरत आहे. महावितरणने तत्काळ जिमलगट्टा-कमलापूर वीज उपकेंद्रात दोन विद्युत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)अवकाळी वादळी पावसाचा फटकाअचानक वातावरणात बदल होऊन सोमवारी रात्रीच्या सुमारास अहेरी तालुक्यात अवकाळी वादळी पाऊस बरसला. यामुळे जिमलगट्टा-कमलापूर भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला. यापूर्वीही गुड्डीगुडम परिसरातील नागरिकांना वादळाचा फटका बसल्याने अंधाराचा सामना करावा लागला. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून वातावरणात गतीने बदल होत आहे. परिणामी अनेक गावात वादळामुळे झाडे पडून विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. दुरूस्तीअभावी अनेक गावे बऱ्याच दिवस अंधारात सापडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
२० गावांची विद्युत व्यवस्था एकाच वीज कर्मचाऱ्यावर
By admin | Updated: May 6, 2015 01:36 IST