शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
2
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
4
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
5
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
6
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
7
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
8
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
9
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
10
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
11
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन
12
पाकिस्तानने चीनमधून रिमोट सॅटेलाईट प्रक्षेपित केला, CPEC वर लक्ष ठेवणार
13
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
14
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
15
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
16
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
17
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
18
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
19
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
20
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"

वीज कोसळून शेतकरी गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 02:48 IST

शेतात पेरणी करीत असताना वीज कोसळल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास नरोटी चक येथे घडली.

नरोटी चक येथील घटना : उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरूआरमोरी : शेतात पेरणी करीत असताना वीज कोसळल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास नरोटी चक येथे घडली. सोमा सुकाजी कुमरे (५५) रा. नरोटी चक असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.तालुक्यातील सिर्सी गट ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या नरोटी चक येथील शेतकरी सोमा कुमरे हे आपल्या शेतात धान पेरणीसाठी गेले. धानाची पेरणी करीत असताना दुपारी अचानक मेघ गर्जनेसह वादळी पाऊस सुरू झाला. पेरणी आटोपून नांगराला जुंपलेले बैल सोडून कुमरे हे घरी जायला निघाले. दरम्यान त्यांच्या जवळ वीज कोसळली. विजेच्या तीव्रतेने ते गंभीर जखमी झाले. दोन्ही बैल घरी पोहोचले. शेतकरी कुमरे बराच वेळ घरी पोहोचले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियासह गावातील उपसरपंच विश्वेसर दर्रो, चंदलाल बनकर, निकेश कुमरे, मोतीराम दर्रो, विजय उसेंडी, मारोती दर्रो हे शेतात जाऊन पाहिले असता, सोमा कुमरे हे बेशुध्द अवस्थेत शेतात पडलेले दिसले. लगेच त्यांना खासगी वाहनाने आरमोरीच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमीवर उपचार सुरू असून या घटनेची माहिती मिळताच वैरागड सर्कलचे मंडळ अधिकारी घरत यांनी उपजिल्हा रूग्णालयात जाऊन जखमी शेतकऱ्याची भेट घेतली. जखमी शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)