शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील विद्युत खांब हटणार

By admin | Updated: November 4, 2014 22:40 IST

शहरातील मुख्य मार्गावर असलेले विद्युत खांब हटवून भूमिगत विद्युत लाईन टाकण्याच्या कामाला सुरूवात झाली असून त्यासाठी नगर परिषदेने सुमारे सव्वा कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.

गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर असलेले विद्युत खांब हटवून भूमिगत विद्युत लाईन टाकण्याच्या कामाला सुरूवात झाली असून त्यासाठी नगर परिषदेने सुमारे सव्वा कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. गडचिरोली शहरातील आरमोरी, धानोरा, चामोर्शी व मुल या राज्य महामार्गावरून दरदिवशी हजारो वाहने धावतात. शहराची वाढती लोकसंख्या व वाढलेली वाहनांची संख्या लक्षात घेतली तर या मार्गांचे रूंदीकरण होणे आवश्यक होते. मात्र रस्त्याच्या बाजूला दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्यांची रूंदी कमी झाली आहे. रस्ते अरूंद असतांनाच नगर परिषदेने चारही मार्गावर रस्ता दुभाजक बांधले आहे. या रस्ता दुभाजकामुळे रस्त्यांची रूंदी आणखी कमी झाली आहे. रस्ता दुभाजक बांधतेवेळी रस्त्यावर असलेले विद्युत खांब हटविणे आवश्यक होते. विद्युत खांबांना वाहने धडक देऊन आजपर्यंत अनेक अपघात घडले आहेत. सदर विद्युत खांब हटविण्याची मागणी नागरिकांकडून मागील २ वर्षांपासून करण्यात येत होती. मात्र नगर परिषद प्रशासन व विद्युत विभागसुद्धा याकडे सोयीस्कर कानाडोळा करीत होते. गडचिरोली शहरातून राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग झाल्यास आंतरराज्यीय वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने रस्ता रूंदीकरणाचे हाती घेतले जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर विद्युत खांब फार मोठी अडचण निर्माण करणार असल्याचे लक्षात आल्यानंतर रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे चारही मार्गावरील विद्युत खांब हटविण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. चारही मार्गावर भूमिगत विद्युत लाईन टाकली जाणार आहे. नगर परिषदेने चारही मार्गावरील विद्युत खांब, डीपी हटवून भूमिगत विद्युत लाईन टाकण्याच्या कामासाठी सुमारे सव्वा कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर काम कंत्राटदाराच्या मार्फतीने करण्यात येत आहे. भूमिगत विद्युत लाईन टाकल्यानंतर ठराविक अंतरावर विद्युत डिस्ट्रीब्युशन बॉक्स बसविण्यात आले आहेत. या बॉक्सच्या शेजारी विद्युत खांब उभे करण्यात आले आहेत. या विद्युत खांबावरून नागरिकांना विद्युत पुरवठा केला जाणार आहे. विद्युत खांब हटल्यामुळे अपघातामध्ये घट होईल, अशी अपेक्षा शहरातील नागरिक करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)