शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास आठ वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:41 IST

वर्गात पेपर सोडवीत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास येथील येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आठ वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

ठळक मुद्देजिल्हा न्यायालयाचा निकाल : अडीच हजार रूपयांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वर्गात पेपर सोडवीत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास येथील येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आठ वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अमोल दुधराम बारसागडे रा. भाडभिडी असे दोषी इसमाचे नाव आहे.पीडित विद्यार्थिनी ही २० आॅक्टोबर २०१६ रोजी शाळेत पेपर सोडवित होती. आरोपी शिक्षक अमोल दुधराम बारसागडे हा पर्यवेक्षक म्हणून वर्गावर उपस्थित होता. पीडित विद्यार्थिनी वर्गात पेपर सोडवीत असताना अमोल बारसागडे तिच्या जवळ गेला. त्यानंतर त्याने त्या विद्यार्थिनीच्या शेजारी बसून तिचा विनयभंग केला. विद्यार्थिनीने या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर मुख्याध्यापकांनी अमोल बारसागडेविरुद्ध घोट पोलीस मदत केंद्रात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी २० आॅक्टोबर २०१६ रोजी अमोल बारसागडेवर भादंवि कलम ३५४(अ) व बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमाच्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करुन त्याच दिवशी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक विशाल शिंदे यांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.मंगळवारी या खटल्याचा निकाल लागला. न्यायालयाने पीडित मुलगी व अन्य साक्षदारांचे बयाण नोंदवून, तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी अमोल बारसागडे यास भादंवि कलम ३५४(अ) अन्वये तीन वर्षांचा सश्रम कारावास व अडीच हजार रुपयांचा दंड आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमान्वये पाच वर्षांचा कारावास व अडीच हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. सदर निकाल जिल्हासत्र न्यायाधीश यू. एम. पदवाड यांनी दिला.सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले.