शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

निमगावात खेळताबागळताना सुरू आहे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:00 IST

शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अजूनपर्यंत शाळा सुरू झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवावे, असे निर्देश शासनामार्फत देण्यात आले आहेत. मात्र ग्रामीण भागातील पालकांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी राबविणे कठीण आहे. विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली आहेत.

ठळक मुद्देनावीण्यपूर्ण उपक्रम : गावातील घरांच्या भिंतींवर लावले अभ्यासक्रमाशी संबंधित बॅनर

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : लॉकडाऊनमुळे शाळा बंद असतानाही गावात शैक्षणिक वातावरण तयार व्हावे, तसेच विद्यार्थ्यांना खेळताबागळताना शिकता यावे, यासाठी येथील जिल्हा परिषद शाळेने गावातील मुख्य चौकात तसेच महत्त्वाच्या ठिकाणी शिक्षणाशी संबंधित ७० बॅनर लावले आहेत. या नावीण्यपूर्ण उपक्रमाची पालकांकडून प्रशंसा होत आहे.शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अजूनपर्यंत शाळा सुरू झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवावे, असे निर्देश शासनामार्फत देण्यात आले आहेत. मात्र ग्रामीण भागातील पालकांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी राबविणे कठीण आहे. विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली आहेत. मात्र शाळा सुरू नसल्याने स्वत: पुढाकार घेऊन विद्यार्थी अभ्यास करत नाही.शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे, शाळेत शिक्षक येत आहेत. मात्र विद्यार्थी शाळेत येत नसल्याने उन्हाळ्याच्या सुट्यांप्रमाणे विद्यार्थी अभ्यास करीत नाही. गावात शैक्षणिक वातावरण तयार केल्यास विद्यार्थी थोड्याफार प्रमाणात शिकतील, ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक देवेंद्र लांजेवार यांनी पहिली ते सातवीपर्यंतच्या अभ्यासक्रमाशी संबंधित दोन बाय तीन फुटाचे सुमारे ७० बॅनर स्व:खर्चाने तयार करून ते गावातील मुख्य चौक, दर्शनी भागावरील घराची भिंत, मंदिर, मुलांची खेळण्याची जागा या ठिकाणी लावले आहेत. त्यामुळे विद्यार्थी बाहेर खेळताना, चौकात एखाद्या ठिकाणी बसले असताना बॅनर दिसून येत आहेत. खेळतानाच बॅनरवरील मजकूर वाचत असल्याने त्या माध्यमातून त्यांचे अध्ययन होत आहे. तसेच गावात विविध ठिकाणी बॅनर लागले असल्याने गावात शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे. बॅनर बघून पालकही विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आग्रह धरत आहेत.शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी अशाप्रकारचा नावीण्यपूर्ण उपक्रम राबविणारी निमगाव जिल्हा परिषद शाळा ही जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे. अशा प्रकारचे नावीण्यपूर्ण उपक्रम इतरही शाळांनी राबविण्याची गरज आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.पहिल्या टप्प्यात ७० बॅनर लावले आहेत. बॅनर लावण्यासाठी उपक्रमशील शिक्षक देवेंद्र लांजेवार यांना शिक्षिका वर्षा नाकाडे, संतोष कोल्हे यांनी मदत केली.बॅनरवर या अभ्यासक्रमांचा आहे समावेशमुळाक्षरे, साधे शब्द, चौदाखडी, इंग्रजीचे साधे शब्द, गार्डन ऑफ वर्ड, गणिताचे सुत्र, गणिताचे नियम, विविध प्रकारचे नकाशे, बे-एकचे पाडे, जोडाक्षरे, एकाच शब्दाचे विविध अर्थ, व्याकरणाचे नियम, विविध कसोट्या, इंग्रजीचे छोटे वाक्य, शब्दांचा डोंगर, म्हणी व वाक्यप्रचार, समानार्थी शब्द, विरूद्धार्थी शब्द, अनेक शब्दांबद्दल एकच शब्द, भौमिती आकार आदी अभ्यासक्रमाचा समावेश असलेले बॅनर लावले आहेत. गावातील एखादा सुशिक्षित व्यक्ती रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थ्याला थांबवून बॅनरवरची माहिती विचारते किंवा वाचायला लावत आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या विद्यार्थ्यांचे अध्ययन होत आहे, अशी माहिती देवेंद्र लांजेवार यांनी दिली.

टॅग्स :Educationशिक्षण