शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

श्रावण मासात मार्कंडेश्वर मंदिरात भक्तांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:16 PM

चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडेश्वर देवस्थान येथे श्रावण मासानिमित्त महिनाभर पूजाअर्चा, अभिषेक, बिल्वार्चन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच दर सोमवारी मार्र्कंडेश्वराची पालखी काढली जाणार आहे.

ठळक मुद्देभाविकांसाठी व्यवस्था : सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते पूजा

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडेश्वर देवस्थान येथे श्रावण मासानिमित्त महिनाभर पूजाअर्चा, अभिषेक, बिल्वार्चन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच दर सोमवारी मार्र्कंडेश्वराची पालखी काढली जाणार आहे.संपूर्ण महिनाभर महापूजा करण्याचा मान मंगेश आनंदवार व त्यांच्या पत्नी शितल मंगेश आनंदवार यांना देण्यात आला आहे. १२ आॅगस्ट रोजी श्रावण मासाच्या प्रारंभानिमित्त प्रफुल्ल गजानन भांडेकर व त्यांच्या पत्नी वैशाली भांडेकर, पंकज पांडुरंग पांडे, त्यांच्या पत्नी शुभांगी पंकज पांडे यांच्या हस्ते पूजाअर्चा, अभिषेक व बिल्वार्चन पूजा करण्यात आली.यावेळी मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजाननराव भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, सहसचिव रामुजी तिवाडे, भारतीय पुरातत्व विभागाचे ए. एस. आय. शिंदे, मिथून चलाख यांच्यासह भाविक उपस्थित होते.श्रावण महिन्यात भाविक मोठ्या संख्येने मार्र्कंडेश्वर मंदिरात पूजाअर्चा करण्यासाठी येतात. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मार्र्कंडादेवस्थान ट्रस्टच्या वतीने पूजेच्या ठिकाणी मंडप, शुध्द पाण्याची व्यवस्था, महाप्रसाद आदी सोयीसुविधा उपलब्ध करून दिले आहेत. श्रावणमासभर दर सोमवारी रामप्रसाद महाराज मराठा धर्मशाळेतून पालखी काढली जाईल. ही पालखी मार्र्कंडादेव येथील मुख्य मार्गाने फिरून मार्र्कंडादेव मंदिरात थांबेल. त्यानंतर पुन्हा परत रामप्रसाद महाराज धर्मशाळेकडे येईल. या ठिकाणी पालकीची सांगता होईल. भजन मंडळांचे या ठिकाणी विशेष आकर्षण राहते.श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार निमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, त्यांचे पती मधुकर भांडेकर यांच्या हस्ते पूजाअर्चा केली जाणार आहे. महिनाभर या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याने भाविकांची मांदियाळी राहणार आहे.