शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाघिणीमुळे अभयारण्यातील गावांमध्ये पसरली दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आरमोरी व देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ घालणाºया वाघिणीला २९ आॅगस्ट रोजी चपराळा अभयारण्यात सोडण्यात आले. त्यामुळे अभयारण्यात असलेल्या मार्र्कंडा (कं.), धन्नुर, चौडमपल्ली, चंदनखेडी, चपराळा, सिंघनपल्ली या गावांतील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शासनाने चपराळा अभयारण्य १९८६ मध्ये घोषीत केले. या अभयारण्याची सीमा १३४ चौरस किमीपर्यंत पसरली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आरमोरी व देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ घालणाºया वाघिणीला २९ आॅगस्ट रोजी चपराळा अभयारण्यात सोडण्यात आले. त्यामुळे अभयारण्यात असलेल्या मार्र्कंडा (कं.), धन्नुर, चौडमपल्ली, चंदनखेडी, चपराळा, सिंघनपल्ली या गावांतील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शासनाने चपराळा अभयारण्य १९८६ मध्ये घोषीत केले. या अभयारण्याची सीमा १३४ चौरस किमीपर्यंत पसरली आहे. या अभयारण्यात वाघ नसल्याने हरीण, सांबर, चितळ यासारख्या तृणभक्षी प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शासनाने अभयारण्य घोषीत केले. मात्र या अंतर्गत येणाºया गावांचे पुनर्वसन केले नाही. त्यामुळे चपराळा, धन्नुर, मार्र्कंडा कं., सिंगमपल्ली, चौडमपल्ली ही गावे अजुनही अभयारण्याच्या परिसरातच आहेत. आजपर्यंत या ठिकाणी वाघ, बिबट यासारखा हिंस्त्रप्राणी नसल्याने अभयारण्यात असूनही स्थानिक नागरिकांची कोणतीही तक्रार नव्हती. आता मात्र या अभयारण्यात नरभक्षक असल्याचा संशय असलेली वाघिण सोडण्यात आली आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. जंगलामध्ये शिकारीसाठी असंख्य प्राणी आहेत. जंगलातच पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत वाघ रस्त्यांवर किंवा गावात येणार नाही, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाºयांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.चपराळा अभयारण्यात येणाºया सहाही गावांमध्ये वन विभागामार्फत दवंडी दिली आहे. नागरिकांनी आपली जनावरे जंगलात सोडू नये व नागरिकांनी जंगलातही जाऊ नये. वाघिणीला कॉलर आयडी लावण्यात आला आहे. या माध्यमातून वाघिणीच्या हालचालींवर नियंत्रण राहणार आहे.- डी. व्ही. कैलुके, वन परिक्षेत्राधिकारी, वन्यजीव कार्यालय चौडमपल्लीउन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीरसद्य:स्थितीत चपराळा अभयारण्यात पाणी व प्राणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे पावसाळा व हिवाळाभर वाघिणीला कोणतीच समस्या जाणवणार नाही. मात्र उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवणार आहे. झुडूपे नसल्याने शिकार करण्यासही अडचण निर्माण होणार आहे. या अगोदर या अभयारण्यात दोन वाघ सोडण्यात आले होते. मात्र पाण्याच्या टंचाईमुळे वाघांनी पळ काढला होता.