शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कुरखेडात विदर्भवाद्यांनी दिले धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 01:34 IST

स्थानिक गांधी चौकात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गांधी जयंतीदिनी मंगळवारला स्वतंत्र्य विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊन सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सामूहिक उपोषण करण्यात आले.

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांचा आरोप : भाजपच्या सत्ताधाºयांनी फसवणूक केली; आश्वासनांचा विसर

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : स्थानिक गांधी चौकात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गांधी जयंतीदिनी मंगळवारला स्वतंत्र्य विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊन सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सामूहिक उपोषण करण्यात आले. दरम्यान भाजपच्या सत्ताधारी पुढाऱ्यांनी वैदर्भीय जनतेची फसवणूक केली, असा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.मागील सार्वत्रीक निवडणुकीत भाजपाने स्वतंत्र विदर्भाचा नारा देत एकहाती निवडणूक जिंकली मात्र त्यानंतर सत्ताधारी पुढाऱ्यांना आश्वासनाचा विसर पडला, अशी टीका यावेळी अनेक वक्त्यांनी मार्गदर्शन करताना केली.स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय हे आंदोलक स्वस्थ बसणार नाही, असा संकल्प सुद्धा यावेळी करण्यात आला. या आंदोलनात समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर, उपाध्यक्ष घिसू खुणे, तालुकाध्यक्ष गणपत सोनकुसरे, संघटक वामदेव सोनकुसरे, तालुका उपाध्यक्ष रमेश मानकर, युवक आघाडी अध्यक्ष रामचंद्र रोकडे, ग्यानचंद्र सहारे, महीला आघाडी अध्यक्ष मीना भोयर, उपाध्यक्ष शीला इस्कापे, चितांमन सहारे, तुलाराम कवडो, यादव सहारे, प्रल्हाद खुणे, रामचंद्र कोडाप, राजीराम पात्रीकर, चागंदेव वट्टी, कारु पाटनकर, प्रदीप विढोले, किसनलाल साहळा, गुरूदेव काटेंगे, संतोष साहळा, रामदास शेंडे, रवींद्र जनबंधू, क्रिष्णा जांभुळकर, केवळराम मरसकोल्हे, गिरीधर वट्टी आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ