शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अमर्यादित उपशातून जमिनीची कोरड वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 23:39 IST

दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याचा उपसा वाढत असताना जल पुनर्भरणाच्या उपाययोजनांकडे मात्र पाठ फिरविण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी आणखी खोल जात आहे. गेल्या पाच वर्षातील सरासरी पातळीच्या तुलनेत यावर्षी पाण्याची पातळी ०.३४ मीटरने खोल गेली आहे.

ठळक मुद्देपातळी खालावली : खासगी बोअरवेल यंत्रणेच्या नियंत्रणाबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याचा उपसा वाढत असताना जल पुनर्भरणाच्या उपाययोजनांकडे मात्र पाठ फिरविण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी आणखी खोल जात आहे. गेल्या पाच वर्षातील सरासरी पातळीच्या तुलनेत यावर्षी पाण्याची पातळी ०.३४ मीटरने खोल गेली आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास गडचिरोलीवासीयांना येत्या काही वर्षात उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण होणार आहे.अनेक गावांमध्ये पाण्याच्या सुविधेसाठी नागरी वसाहतीत बोअरवेल (हातपंप) खोदल्या जातात. पाणी पुरवठा विभागाकडून त्याबाबतचा प्रस्ताव गेल्यानंतर जिल्हाधिकारी त्या बोअरवेल खोदण्यास मंजुरी देतात. यावर्षीही २८ बोअरवेलला काही दिवसांपूर्वीच मंजुरी देण्यात आली. सार्वजनिक वापरासाठी असलेल्या अशा बोअरवेलला मंजुरी देताना नागरी सुविधेचा निकष लावला जातो. पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीसाठी ते गरजेचेही मानले जाते. परंतू अनेक लोक स्वत:च्या जागेत कोणतीही परवानगी न घेता खासगी बोअरवेल तयार करून त्यावर मोटर बसवत आहेत. त्यातून अमर्याद पाणी उपसा सुरू आहे. अशा खासगी बोअरवेलची संख्या शहरी भागात दररोज वाढत आहे. सार्वजनिक नळाची सुविधा असतानासुद्धा अशा पद्धतीने अनधिकृत बोअरवेल खोदण्याचे प्रमाण वाढत असून त्यांच्यावर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.ग्रामपंचायतींकडून येणाऱ्या बोअरवेलच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यासासाठी भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यरत आहे. जमिनीतील पाणीपातळीची तपासणी करून सार्वजनिक हितासाठी ६० मीटरपर्यंतच्या (२०० फूट) बोअरवेलला परवानगी देण्याचे काम ही यंत्रणा करते. परंतू आपल्या घराच्या आवारात बोअरवेल खोदणारे कोणतीच परवानगी न घेता अनधिकृतपणे पाण्याचा उपसा करत आहेत. त्यांच्यावर सरकारी यंत्रणेचे कोणतेच नियंत्रण नसून कोणावरच कारवाई होताना दिसत नाही.भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या नोंदीनुसार गेल्या पाच वर्षाची जिल्ह्याची सरासरी पाणी पातळी ६.२७ मीटर आहे. मात्र यावर्षीची पाणी पातळी ६.६१ मीटरवर गेली आहे. आरमोरी, वडसा, धानोरा आणि मूलचेरा या तालुक्यांमध्ये आहे.रेनवॉटर हॉर्वेस्टिंगचा विसरकाही वर्षांपूर्वी नवीन बांधल्या जाणाºया सरकारी इमारतींसाठी रेनवॉटर हॉर्वेस्टिंग सक्तीचे करण्यात आले आहे. राज्यात अनेक भागात त्याशिवाय बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्रच दिले जात नाही. गडचिरोलीत मात्र नव्याने बांधलेल्या अनेक सरकारी इमारतींमध्येही या प्रकारची सुविधा नाही. याची तपासणी केल्यास सदर यंत्रणेचा कारभार उघड होऊ शकेल.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई