शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अवैध अतिक्रमणामुळे वनजमिनीचे क्षेत्र होतेय कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:09 IST

तालुक्याच्या बारसेवाडा, चंदनवेली तसेच जारावंडी, दोलंदा परिसरात वनजमिनीवर अतिक्रमण करून ही जमीन शेती कामासाठी वापरली जात आहे. काही ठिकाणी शेततळे व शेतबोडीसाठीही जंगल तोडून वनक्षेत्र कमी केले जात आहे. परिणामी गेल्या काही वर्षांपासून वनजमिनीचे क्षेत्र कमी होत आहे.

ठळक मुद्देवनविभागाचा कानाडोळा : मौल्यवान वनसंपत्ती धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्याच्या बारसेवाडा, चंदनवेली तसेच जारावंडी, दोलंदा परिसरात वनजमिनीवर अतिक्रमण करून ही जमीन शेती कामासाठी वापरली जात आहे. काही ठिकाणी शेततळे व शेतबोडीसाठीही जंगल तोडून वनक्षेत्र कमी केले जात आहे. परिणामी गेल्या काही वर्षांपासून वनजमिनीचे क्षेत्र कमी होत आहे. मात्र या प्रकाराकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे.एटापल्ली तालुका हा घनदाट जंगलांनी व्यापलेला असून वर्षभर वनजमिनीवर अतिक्रमण केले जात आहे. अनेक शेतकरी आपल्या शेतालगतच्या जंगलातील झाडे तोडून आपले शेतजमिनीचे क्षेत्र वाढवत आहे. पूर्वी झाडाची साल काढून झाडाला मारले जात होते. त्यानंतर उभ्या झाडाच्या मुळाला आगही लावले जात होते. झाडाला आग लावल्यावर त्या झाडाचा लाकूड सुद्धा उपयोगात येत नाही. ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलॅन्ड यासारख्या आधुनिक यंत्राचा वापर करून एटापल्ली तालुक्यात वनजमिनीवर अतिक्रमण करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.जारावंडी-दोलंदा मार्गावर शेतजमीन वाहनासाठी सुद्धा मोठमोठी झाडे तोडले जात आहे. अनेक ठिकाणच्या वनजमिनीवर शेततळे खोदल्या जात असल्याने त्या ठिकाणची झाडे तोडल्या जात आहेत. बरेच शेतकरी वनजमिनीवर अतिक्रमण करतात. मात्र त्या जागेवर कोणत्याही पिकाची लागवड करीत नाहीत. अतिक्रमणामुळे जंगलातील मौल्यवान झाडे नष्ट होत असून जंगल धोक्यात सापडले आहे. वनविभागाने यावर ठोस उपाययोजना करून घनदाट जंगल वाचवावे, अशी मागणी काही सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणforestजंगल