शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे मार्ग बंद

By admin | Updated: September 9, 2014 00:21 IST

सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ६०.१४ मिमीच्या सरासरीने ७३१.७ मिमी पाऊस झाला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यातील चार मार्गाची वाहतूक सोमवारी

६०.१४ मिमी पाऊस : भामरागडचा संपर्क तुटलेलाचगडचिरोली : सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ६०.१४ मिमीच्या सरासरीने ७३१.७ मिमी पाऊस झाला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यातील चार मार्गाची वाहतूक सोमवारी दुपारपर्यंत ठप्पच होती. या पावसामुळे मुलचेरा तालुक्यातील गोमणी गावात ४३ घरांची पडझड झाली आहे. येथील ४६ कुटुंबाना सुंदरनगर येथे हलविण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत गडचिरोली तालुक्यात ९३.६, धानोरा तालुक्यात १३४, चामोर्शी तालुक्यात ६०, मुलचेरा तालुक्यात ३१, देसाईगंज तालुक्यात १०५.३, आरमोरी तालुक्यात ६७, कुरखेडा तालुक्यात ९०, कोरची तालुक्यात १२.४, अहेरी तालुक्यात ३२.२, एटापल्ली तालुक्यात ३३.६, भामरागडमध्ये ३७, सिरोंचा येथे २५.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कठाणी नदीला पूर आल्यामुळे गडचिरोली-नागपूर मार्गावरची वाहतूक रविवारच्या संध्याकाळपासून सोमवारी दुपारपर्यंत बंदच होती. त्यानंतर दुपारी ३ वाजता गडचिरोली-चंद्रपूर मार्ग खुला झाला. वैरागड-देलनवाडी मार्गही बंद झाला आहे. बोलेपल्ली मार्ग बंद झाला असून भामरागड-आलापल्ली मार्गावरची वाहतूक बंदच आहे. भामरागड तालुक्यातील १०० वर अधिक गावांचा संपर्क तुटलेला आहे. दिना नदीचा पूर ओसरल्याने आलापल्ली-चंद्रपूर मार्गावरची वाहतूक पूर्ववत सुरू झाली. या संततधार पावसामुळे चामोशी तालुक्यात १७५ घरांची पडझड झाली आहे. या पडझडीत ७ लाख २० हजार ४८० रूपयाचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. येनापूर सर्कलमध्ये ६० घर पडले असून १ लाख ५० हजार ७८० रूपयाचे नुकसान झाले. घोट सर्कलमध्ये ६१ घरांची पडझड झाली असून २ लाख ३७ हजार ७०० रूपयाचे नुकसान झाले आहे. आष्टी सर्कलमध्ये ६ घरांची पडझड झाली असून ३६ हजाराची नुकसान आहे. चामोर्शी सर्कलमध्ये ३० घरांची पडझड झाली आहे. येथे १ लाख १८ हजाराचे नुकसान झाले. कुनघाडा सर्कलमध्ये १८ घरांची पडझड झाली आहे. तेथे ७८ हजार ६८० रूपयाचे नुकसान झाले आहे. या सर्व पडझडीचा पंचनामा तलाठ्यांनी केला असून चामोर्शी तहसील प्रशासनाला याबाबतचा अहवाल देण्यात आला आहे. अहेरी येथील बेघर कॉलनी वार्ड क्रमांक ४ मधील नंदू झाडे यांच्या घरावरचे छत अतिवृष्टीमुळे उडाल्याने त्यांचे घरातील सामान पूर्णत: भिजले आहे. अहेरीचे तलाठी जल्लेवार यांनी मोक्कापंचनामा केला असून १ लाखाचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. संततधार पावसामुळे अहेरीचा विद्युत पुरवठा ३२ तास बंद होता. तो सोमवारी पहाटे ३ वाजता पूर्ववत सुरू झाला. अहेरीतील काही भागातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलन केले. यावेळी सरपंच गंगाराम कोडापे, सदस्य शैलेश पटवर्धन, नायब तहसीलदार किरमे, आत्राम यांनी नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या भावना समजून घेतल्या व नुकसानाबाबत सर्व्हे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. सोमवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील अनेक मार्ग खुले झाले. त्यामुळे काही भागातील वाहतूक सुरळीत झाली. परंतु वैनगंगा नदीला अलेल्या पुराचा दाब कायम होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)