शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाने जिल्ह्यातील पावणे दोन लाख हेक्टर क्षेत्र बाधित

By admin | Updated: January 11, 2016 01:29 IST

यावर्षीच्या दुष्काळाने गडचिरोली जिल्ह्यातील खरीप हंगामातील १ लाख ८१ हजार ५१३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

महसूल विभागाची माहिती : शासनाकडून मिळणार लाभगडचिरोली : यावर्षीच्या दुष्काळाने गडचिरोली जिल्ह्यातील खरीप हंगामातील १ लाख ८१ हजार ५१३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. याचा फटका १ लाख २२ हजार ५३० शेतकऱ्यांना बसला आहे. ५० टक्के पेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांसाठी शासनाने मदत जाहीर केली आहे. याचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार आहे. खरीप हंगामाची पेरणी होणारे गडचिरोली जिल्ह्यात जवळपास १ हजार ५३१ गावे आहेत. या गावांपैकी १ हजार ३९८ गावांची आणेवारी ५० पैसे पेक्षा कमी आहे. या गावांमध्ये शासनातर्फे उपाययोजना केल्या जाणार आहेत. महसूल व कृषी विभागाने केलेल्या पाहणीनुसार गडचिरोली तालुक्यातील १८ हजार ४१७ शेतकऱ्यांचे २४ हजार १३९ हेक्टर क्षेत्र बाधित झाली आहे. धानोरा तालुक्यातील ११ हजार ७४६ शेतकऱ्यांचे २३ हजार ४५ हेक्टर, चामोर्शी तालुक्यातील २७ हजार २९ शेतकऱ्यांचे ३७ हजार ६३८ हेक्टर, मुलचेरा तालुक्यातील ४ हजार १९ शेतकऱ्यांचे ६ हजार १८२, देसाईगंज तालुक्यातील ५ हजार ६०८ शेतकऱ्यांचे ६ हजार ४० हेक्टर, आरमोरी तालुक्यातील १६ हजार ४२३ शेतकऱ्यांची १८ हजार ८३ हेक्टर, कुरखेडा तालुक्यातील १२ हजार ८६१ शेतकऱ्यांचे १६ हजार २३०, कोरची तालुक्यातील ६ हजार ५६१ शेतकऱ्यांचे १२ हजार ४५९, अहेरी तालुक्यातील ७ हजार १४१ शेतकऱ्यांचे ११ हजार ४७५, भामरागड तालुक्यातील २ हजार ९०३ शेतकऱ्यांचे ८ हजार ४२४, एटापल्ली तालुक्यातील ७ हजार ८५५ शेतकऱ्यांचे १५ हजार ४८९, सिरोंचा तालुक्यातील १ हजार ९६७ शेतकऱ्यांचे २ हजार ३०६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. ५० टक्के पेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांची यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. दुष्काळासाठी केंद्राने निधीही उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या निधीचे आता कधी वितरण केले जाते. याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर हेक्टरी किती मदत दिली जाते, याचीही शेतकरीवर्ग आवासून वाट बघत आहे. (नगर प्रतिनिधी)