शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

आवक घटल्याने भाजीपाला कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी नोव्हेंबर ते मे या कालावधीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. या कालावधीत कीड कमी प्रमाणात लागते. त्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी येतो. तसेच धान निघाल्यानंतर त्याच ठिकाणी भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. पावसाळ्यात मात्र पावसामुळे भाजीपाल्याची झाडे जगू शकत नाही. तसेच जास्त प्रमाणात कीड लागत असल्याने वेळोवेळी फवारणी करावी लागते.

ठळक मुद्देजिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांवर मदार : टोमॅटो, कारले, वांगी, पत्ताकोबी, फुलकोबी, मिरची आदींचे भाव वाढले

दिगांबर जवादे ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भाजीपाला उत्पादन जवळजवळ बंद झाले आहे. परिणामी नागपूरच्या ठोक बाजारपेठेतून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या भाजीपाल्यावर गडचिरोलीकरांना विसंबून राहावे लागत आहे. नागपूरच्या बाजारपेठेत भाव वाढल्याने त्याचा थेट परिणाम गडचिरोली जिल्ह्यातील भाज्यांच्या किमतीवर झाला आहे.गडचिरोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी नोव्हेंबर ते मे या कालावधीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. या कालावधीत कीड कमी प्रमाणात लागते. त्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी येतो. तसेच धान निघाल्यानंतर त्याच ठिकाणी भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. पावसाळ्यात मात्र पावसामुळे भाजीपाल्याची झाडे जगू शकत नाही. तसेच जास्त प्रमाणात कीड लागत असल्याने वेळोवेळी फवारणी करावी लागते. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी पावसाळ्यात भाजीपाल्याचे उत्पादन घेत नाही. सद्यस्थितीत नागपूर येथून येणाऱ्या भाजीपाल्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. नागपूर बाजारपेठेतून दर दिवशी गडचिरोली येथील गुजरीत मालवाहू वाहनांनी भाजीपाला आणला जातो. नागपुरात भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. त्याचा थेट परिणाम गडचिरोली जिल्ह्यातील भाजीपाला दरावर झाला. लॉकडाऊन आधीच्या तुलनेत ५० टक्के भाव वाढले आहेत.टोमॅटोचे दर झाले दुप्पटटोमॅटो हा भाजीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. उन्हाळभर टोमॅटो २० ते ४० रूपये दराने उपलब्ध होत होते. मात्र मागील १५ दिवसांपासून टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाली आहे. सुमारे ७० ते ८० रूपये किलो दराने टोमॅटो खरेदी करावे लागत आहेत.भेंडी थोडी सावरलीगडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भेंडीचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी भेंडीसाठी हवामान चांगले असल्याने मोठ्या प्रमाणात भेंडीचे उत्पादन झाले. त्यामुळे लॉकडाऊनपूर्वी आणि नंतरही काही दिवस १० ते १५ रूपये किलो दराने शेतकरी शहरात फिरून भेंडीची विक्री करीत होते. आता मात्र शेतकऱ्यांची भेंडी निघणे बंद झाल्याने भेंडीचे भाव वाढले असून ३० रूपयाला किलो दराने विकली जात आहे.लिंबाचे भाव घसरलेपावसाळ्यात लिंबू मोठ्या प्रमाणात लागतात. तसेच पावसाळ्यातील लिंबूचा आकारसुद्धा मोठा राहते. त्यामुळे इतर भाजीपाला महाग झाला असताना लिंबू मात्र स्वस्त झाले आहेत. पूर्वी १० रूपयाला दोन किंवा तीनच लिंबू दिले जात होते. आता मात्र दहा रूपयाला पाच ते सहा लिंबू दिले जात आहेत. लोंच टाकण्यासाठी लिंबू खरेदी केले जातात.

टॅग्स :vegetableभाज्या