शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद कारचालकाने पाच जणांना उडविले, नागरिकांनी दिला कारचालकास चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 22:20 IST

मद्यधुंद कारचालकाने चुकीच्या बाजूने कार चालवून पाच ते सहा जणांना उडविल्याची घटना बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास येथील धानोरा मार्गावरील गुरूदेव हॉटेलजवळ घडली.

गडचिरोली : मद्यधुंद कारचालकाने चुकीच्या बाजूने कार चालवून पाच ते सहा जणांना उडविल्याची घटना बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास येथील धानोरा मार्गावरील गुरूदेव हॉटेलजवळ घडली. या अपघातात पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. ट्रक मध्येच आल्यामुळे पुढील अनर्थ टळल्याचे बोलले जात असून कारचालकास नागरिकांनी चांगलाच चोप दिला.एमएच-३३-व्ही-११०९ क्रमांकाची कार घेऊन कारचालक पेट्रोल पंपापासून भरधाव वेगाने निघाल्यानंतर रस्त्यात मिळेल त्याला उडवित होता. बसस्थानकानजीक एमएच-३४-एएस-०३३६ क्रमांकाच्या दुचाकीस धडक दिली. या धडकेत दुचाकी पूर्णत: क्षतिग्रस्त झाली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. यानंतर रस्त्यात आलेल्या अनेक जणांना उडवित जात असताना सीजी-०४-एमसी-५५०७ क्रमांकाचा ट्रक समोर आल्याने ट्रकला धडक देऊन कार थांबली. यामुळे पुढील अनर्थ टळला.कारचालक कारमधून उतरून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर नागरिकांच्या तावडीतून आरोपी चालकास सोडवून रुग्णवाहिकेने रुग्णालयात पाठविले. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक गोळा झाल्याने वाहतूक खोळंबली होती. या अपघातात काही जण गंभीर जखमी झाले असून, प्रकृती धोकादायक असल्याची माहिती आहे. गडचिरोलीचे ठाणेदार दीपरत्न गायकवाड यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली.

टॅग्स :carकार