शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पावणे दोन लाख क्विंटल धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:59 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत....

ठळक मुद्देगोदामांची कमतरता : ४ लाख ५८ हजार क्विंटलची खरेदी

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत एकूण ७१ कोटी १ लाख ७१ हजार ५१३ रूपये किमतीची ४ लाख ५८ हजार १७५ क्विंटल इतकी धान खरेदी करण्यात आली आहे. यापैकी जवळपास १.७० लाख क्विंटल धान केंद्राच्या परिसरात उघड्यावर आहे. गोदामाची कमतरता असल्याने ही समस्या उद्भवली आहे.खरेदी केलेल्या एकूण धानापैकी १ लाख ९ हजार ३८५ क्विंटल धान गोदामात साठविण्यात आला आहे. ६० हजार क्विंटल धान भरडाईसाठी राईस मिलमध्ये पाठविण्यात आला आहे. उघड्यावरील ५४ हजार क्विंटल धानाची उचल महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. गोदामाच्या पुरेशा व्यवस्थेअभावी अद्यापही १ लाख ७० हजार क्विंटल धान उघड्यावर असल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५४ केंद्रांवरून आतापर्यंत एकूण ३ लाख ३७ हजार ५३९ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. या धानाची किंमत ५२ कोटी ३१ लाख ८६ हजार २७१ रूपये आहे. एकूण १८ हजार ४६३ शेतकºयांनी महामंडळाच्या केंद्रावर धानाची विक्री करून आधारभूत खरेदी योजनेचा लाभ घेतला आहे.अहेरी उपविभागात यंदा ३५ केंद्र मंजूर करण्यात आले. यापैकी ३४ केंद्रावर धानाची आवक झाली. आतापर्यंत ३४ केंद्रांवरून १ लाख २० हजार ६३५ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. खरेदी केलेल्या धानाची एकूण किंमत १८ कोटी ६९ लाख ८५ हजार २४२ रूपये आहे. कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत गोठणगाव, कुरखेडा, वडेगाव, सोनसरी घाटी, आंधळी, कढोली, गेवर्धा, पलसगड व देऊळगाव या १० धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत एकूण ७६ हजार १०९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. या धानाची किंमत ११ कोटी ७९ लाख ६९ हजार ३९९ रूपये आहे. कोरची उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत रामगड, येंगलखेडा, मालेवाडा, पुराडा, खेडेगाव, कोरची, बेतकाठी, बोरी, मरकेकसा, कोटरा, कोटगुल, गॅरापत्ती, बेडगाव व मसेली आदी १४ केंद्रांवरून १५ कोटी ३ लाख ६३ हजार ९०३ रूपये किमतीच्या ९७ हजार ८ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयांर्तत अंगारा, उराडी, देलनवाडी, दवंडी, कुरंडी माल, पोटेगाव, चांदाळा, मौशीखांब, पिंपळगाव व विहिरगाव आदी १० केंद्रांवर ५८ हजार ३५८ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. या धानाची एकूण किंमत ९ कोटी ४ लाख ५५ हजार ६२८ रूपये आहे. धानोरा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत रांगी, मुरूमगाव, सुरसुंडी, सोडे, गट्टा, दुधमाळा, मोहली, पेंढरी, कारवाफा आदी १० केंद्रांवरून आतापर्यंत ४९ हजार ४३० क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. या धानाची किंमत ७ कोटी ६६ लाख १६ हजार ५०० रूपये आहे. घोट परिसरातील १० केंद्रांवरून ५६ हजार ६३२ क्विंटल इतकी धान खरेदी झाली आहे. या धानाची एकूण रक्कम ८ कोटी ७७ लाख ८० हजार ८४० रूपये आहे.१२ कोटींचे धान चुकारे प्रलंबितआदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत १८ हजार ४६३ शेतकºयांनी धानाची विक्री केली आहे. यापैकी १५ हजार ६ शेतकºयांना ५८ कोटी ८३ लाख ६२ हजार ९५० रूपयांचे धान चुकारे अदा करण्यात आले आहे. अद्यापही ३ हजार ४५७ शेतकºयांच्या बँक खात्यात आॅनलाईनरित्या चुकाऱ्याची रक्कम वळती करण्यात आली नाही. या शेतकºयांचे एकूण १२ कोटी १८ लाख ८ हजार ५६३ रूपये प्रलंबित आहे. त्यामुळे सदर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. महामंडळाने गतीने प्रक्रिया करून धान चुकारे लवकर अदा करावे, अशी मागणी आहे.