शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उलटलेल्या ट्रकमधील चालकाची १२ तासानंतर गावकऱ्यांनी केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 05:00 IST

अपघात हाेताच घाटी गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. क्लीनर हा मागच्या डाल्यात झाेपला हाेता. ताे बाहेर फेकल्या गेला. त्याला गावकऱ्यांनी उचलून दवाखान्यात भरती केले. या अपघातात चालकच्या केबिनचा चेंदामेंदा झाला. केबिन ताेडल्याशिवाय चालकाला बाहेर काढणे शक्य नव्हते. शनिवारी सकाळपासून रेस्कू ऑपरेशन राबवत जेसीबी व गावकऱ्यांच्या मदतीने ट्रेलरची केबिन फोडून दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास चालकाला बाहेर काढण्यात यश आले

लाेकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : छत्तीसगढ राज्यातून तेलंगाणाकडे जाणारा ट्रेलर (माेठा ट्रक) शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास खड्ड्यामुळे अनियंत्रित होत रस्त्याच्या कडेला उलटला. चेंदामेंदा झालेल्या केबिनमध्ये चालक रात्रभर अडकून पडला हाेता. तासभरानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. क्लिनर गंभीर जखमी झाला आहे.  हा अपघात कूरखेडा-कढोली मार्गावरील घाटी गावाजवळ घडला. रायपूर येथून माेबाइल टाॅवरचे लोखंडी साहीत्य घेऊन सीजी ०७ बीए २४०५ क्रमांकाचा ट्रेलर तेलंगाणा राज्याकडे जात हाेता. खड्ड्यावरून ट्रेलर उसळत रस्त्याचा कडेला पलटला. अपघात हाेताच घाटी गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. क्लीनर हा मागच्या डाल्यात झाेपला हाेता. ताे बाहेर फेकल्या गेला. त्याला गावकऱ्यांनी उचलून दवाखान्यात भरती केले. या अपघातात चालकच्या केबिनचा चेंदामेंदा झाला. केबिन ताेडल्याशिवाय चालकाला बाहेर काढणे शक्य नव्हते. शनिवारी सकाळपासून रेस्कू ऑपरेशन राबवत जेसीबी व गावकऱ्यांच्या मदतीने ट्रेलरची केबिन फोडून दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास चालकाला बाहेर काढण्यात यश आले. शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, भाजप महामंत्री ॲड. उमेश वालदे, माजी नगरसेवक संतोष भट्टड, उल्हास देशमुख, आशिष काळे यांच्यासह घाटी गावकऱ्यांनी  चालकाला बाहेर काढण्यास मदत केली. पप्पू पांडे (५०), रा. दुर्ग, छत्तीसगढ असे चालकाचे नाव आहे. क्लीनरचे नाव कळू शकलेले नाही. दोघांनाही उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले.

घाटीवासीय रात्रभर जागले

अपघात झाल्याचे कळताच घाटीवासीयांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीअभावी किंवा कटरअभावी केबिन ताेडणे शक्य नव्हते.  ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावातील काही नागरिकांनी रात्रभर अपघात स्थळीच थांबून केबिनमध्ये सापडलेल्या चालकाला धीर दिला. तसेच सकाळ हाेताच मदतकार्याला सुरुवात करून चालकाला बाहेर काढले. केबिनमधून बाहेर निघताच चालकाने गावकऱ्यांचे आभार मानले.

रात्रभर कॅबिनमध्ये अडकून पडलेला चालक १२ तासानंतर कॅबिनबाहेर पडला. तसेच अपघातामुळे ट्रकचा असा चेंदामेंदा झाला.

 

टॅग्स :Accidentअपघात