नवनाथ शेंडे (३८) असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. जखमींमध्ये अनिल बावणे (५०), मोरेश्वर कावळे (४५), प्रकाश मंदाडे (४५) यांचा समावेश आहे. हे सर्व जखमी आणि मृत ट्रक चालक चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील सिमडा येथील रहिवासी आहेत.
अपघाताची माहिती मिळताच आलापल्ली येथील शिवसेनेचे उपतालुका प्रमुख प्रफुल्ल येरणे यांनी घटनास्थळ गाठून स्वतःच्या चारचाकी वाहनाने जखमींना अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रियाज शेख व आलापल्ली येथील टायगर ग्रुपचे आदर्श केसलवार, अशोक मद्देर्लावार, मल्लेश आलाम, हसन खान तसेच अहेरी येथील सुरेंद्र अलोणे, शैलेश पटवर्धन, बिरजू गेडाम यांनी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जखमींना मदत केली.
130721\1852-img-20210713-wa0041.jpg
ट्रक