शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

वनहक्क पट्ट्यांपासून डावलले

By admin | Updated: July 23, 2016 01:58 IST

तालुक्यातील जानपल्ली चेक (राजीवनगर) येथे १९९६ पासून जमिनीवर अतिक्रमण करून शेती करणाऱ्या लोकांनी

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : जानमपल्ली येथील शेतकऱ्यांचा आरोप सिरोंचा : तालुक्यातील जानपल्ली चेक (राजीवनगर) येथे १९९६ पासून जमिनीवर अतिक्रमण करून शेती करणाऱ्या लोकांनी सामूहिक वनहक्कासाठी समितीच्या मार्फतीने वनहक्क पट्टे मिळण्याकरिता अर्ज सादर केले होते. परंतु गोरगरीब गरजू पात्र लाभार्थ्यांना प्रशासनाकडून वनहक्क पट्टे मंजूर नाही तर शासकीय सेवेत असलेल्या लोकांना वनहक्क पट्टे वितरित करण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून शेती करणाऱ्या गरीब जनतेवर अन्याय झाला आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी म्हटले आहे. प्रशासनाकडून शासकीय सेवेत मुख्याध्यापक पदावर असलेल्या अनेक व्यक्तींना तसेच बनावट कागदपत्र सादर करणाऱ्या लोकांना वनहक्क बहाल करण्यात आले आहे. काही लोकांनी शासनाची दिशाभूल करून २०००-०१ पासून नोंद असल्याचे दाखवून वनहक्काचा लाभ घेतला. २७ जानेवारी २०१० रोजी सिरोंचाच्या क्षेत्र सहायकांनी मोका चौकशी व क्षेत्रीय तपासणी करून अचूक अहवाल सादर केला. या अहवालात २००९ नंतरचे एका व्यक्तीचे अतिक्रमण असल्याचे दर्शवून दावा अपात्र ठरविला होता. तरीसुद्धा अर्जदाराने काही महसूल कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन बोगस दस्तावेज तयार करून वनहक्क समितीमार्फत सर्वे नं. ६२ पैैकी २.७२ हेक्टर आर जागा संपादित केली. त्या जागेऐवजी सभोवतालच्या एकूण अंदाजे ६ एकर जमिनीवर अवैैध अतिक्रमण केले. वास्तविक वन जमीन गरीब, निराधार, भूमिहिनांना दिली जाते. परंतु जानमपल्ली येथे शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना वनहक्क देण्यात आले आहे. त्यामुळे गरीब व गरजू वनहक्क पट्टे लाभार्थ्यांवर अन्याय होत आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदन अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी स्वीकारले. निवेदन देताना नामेश आयल्ला, नागराज इंगली, लक्ष्मण बोल्ले, मलेश भट्टी, श्रीनिवास गायकोटी उपस्थित होते.