शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नाल्या तुंबल्या, रस्त्यावर पाणी, नुसते सिमेंट रस्ते कशाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 14:40 IST

नागरिकांचा सवाल: वैरागड गावात वाढले घाणीचे साम्राज्य

लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : येथील ग्रामपंचायत चौकापासून ते पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर भूषण धनकर यांच्या पानठेल्यापासून नाल्या असूनदेखील रस्त्याने पाणी वाहत आहे; पण याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होते. याउलट दुसरीकडे सरकारकडून मिळालेल्या निधीची विल्हेवाट लावण्यासाठी केवळ सिमेंट रस्त्याचे काम केले जात आहे. आधीच नाल्या तुंबल्या आहेत, सिमेंट रस्त्यावरून पाणी वाहत आहे. त्याची देखभाल केली जात नाही, तर सिमेंट रस्ते बांधून उपयोग काय? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

वैरागड येथे स्थानिक प्रशासनाचा धाक न राहिल्याने लोक नाल्यामध्ये कचरा आणून टाकतात. नाल्यावर जळावू काड्या, शेतीचे साहित्य ठेवतात त्यामुळे मजुरांना नाल्या उपसता येत नाही त्यामुळे नाल्या तुंबल्या आहेत. ज्या नाल्या मुजरांकरवी उपसल्या गेल्या त्यातही परिसरातील लोक केर कचरा नाल्यात टाकत असल्याने त्या नाल्या पुन्हा बुजल्या आहेत. 

ग्रामपंचायत चौकापासून तर पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या बायपास सिमेंट रस्त्यावर मागील अनेक दिवसांपासून पावसाळा नसतानादेखील पाणी वाहत आहे. या परिसरातील काही नळधारकांच्या नळाला तोट्या नसल्याने त्यांच्या व्यक्तिगत दुर्लक्षितपणामुळे पाण्याचा अपव्यय होतो आणि तो पाणी रस्त्याने वाहत जात आहे. पण याचे त्या नळधारकांना काही देणे-घेणे नाही. 

गावात काही वॉर्डात पाण्याचा अपव्य होत असताना वैरागड येथील रामा खरवडे, केशव गेडाम, चंद्रकांत खरवडे, श्यामसुंदर खरवडे यांच्यासह परिसरातील २० कुटुंबांना मागील महिनाभरापासून पाणी मिळत नसून पाण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागत आहे. वैरागड हे आरमोरी तालुक्यातील मोठे गाव असले तरी या गावाच्या शाश्वत विकासासाठी प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होताना दिसून येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. 

पाइपलाइनच्या कामात फुटली नाली 

  • वैरागडच्या गांधी चौकातील सुरेश लांजिकर ते चंद्रकांत खरवडे यांच्या घरापर्यंतची नाली मागील वर्षभरात पासून उपसण्यात आली नाही. 
  • सिमेंट रस्त्याचे बांधकाम करताना तसेच नळ योजनेची पाइपलाइन टाकण्याच्या कामादरम्यान ही नाली ठिकठिकाणी फुटली आहे. 
  • या नालीतील घाणपाणी लोकांच्या अंगणात जात आहे. त्यामुळे सदर नालीचा उपसा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
टॅग्स :Gadchiroliगडचिरोली