शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बंग दाम्पत्याला ‘हेल्थकेअर ह्युमनिटेरियन’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 13:05 IST

आदिवासींच्या आरोग्यासाठी निष्काम भावनेतून काम करणाऱ्या डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग या दाम्पत्याला फेडरेशन आॅफ इंडियन चेम्बर्स आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘हेल्थकेअर ह्युमनिटेरियन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देभारतीय वाणिज्य आणि उद्योग संस्थेद्वारे सन्मान आरोग्यासाठी केलेल्या कार्याची दखल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासींच्या आरोग्यासाठी निष्काम भावनेतून काम करणाऱ्या डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग या दाम्पत्याला फेडरेशन आॅफ इंडियन चेम्बर्स आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘हेल्थकेअर ह्युमनिटेरियन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथे ३० ऑगस्ट रोजी‘फिक्की’ द्वारे आयोजित दहावे ‘हेल्थकेअर एक्सलन्स’ पुरस्कार व परिषदेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.आरोग्यसेवेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी २००९ पासून या पुरस्काराला सुरुवात करण्यात आली. यंदाचे या पुरस्काराचे दहावे वर्ष आहे. आदिवासी भागात केवळ आरोग्यसेवाच न देता त्यांच्या आरोग्याच्या समस्या कशा कमी करता येतील यासाठी सातत्याने संशोधन करण्याचे काम डॉ. बंग दाम्पत्य ३२ वर्षांपासून करीत आहेत. भारतातील सार्वजनिक आरोग्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. याच कार्याची दाखल घेत या दाम्पत्याला सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दोघांच्या वतीने डॉ. अभय बंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महासंघाचे सरचिटणीस दिलीप चिनॉय, कोकिलाबेन रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राच्या अध्यक्ष टीना अंबानी, केंद्रिय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि दिल्लीचे लेफ्टनन्ट गव्हर्नर अनिल बैजल कार्यक्रमाला उपस्थित होते.

दारू आणि तंबाखू हे आरोग्याविरोधीभारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ ही देशातील सर्वात मोठी व्यावसायिक संस्था आहे. त्यामुळे या संस्थेद्वारे घेतल्या जात असलेल्या प्रत्येक निर्णयाला एक वजन असते. दारू आणि तंबाखू या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी अपायकारक असूनही त्यांचा व्यवसाय भारतात सर्वत्र फोफावत आहे. डॉ. अभय बंग हे शुक्रवारी याच सोहळ्यात आयोजित ‘हेल्थकेअर एट क्रॉसरोड’ या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यात सर्चच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ‘मुक्तिपथ’ या उपक्रमाबाबत माहिती देणार आहेत. महासंघाची दारू आणि तंबाखूबाबत काय भूमिका असावी यावर ते आपली भूमिका मांडणार आहेत.

 

टॅग्स :Healthआरोग्य