शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील राम मंदिरांचे दरवाजे व खिडक्या बनणार गडचिरोलीतील लाकडांपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2023 20:26 IST

Gadchiroli News संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीचे काम जोमाने सुरू आहे. या मंदिराच्या दरवाजांसाठी गडचिरोली जिल्ह्यातील उत्कृष्ट सागवानासाठी प्रसिद्ध असलेल्या आलापल्ली डेपोतील उच्च प्रतिच्या सागवान लाकडांचा वापर केला जाणार आहे.

ठळक मुद्देएल ॲन्ड टी कंपनीच्या चमूकडून पाहणी

गडचिरोली : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीचे काम जोमाने सुरू आहे. या मंदिराच्या दरवाजांसाठी गडचिरोली जिल्ह्यातील उत्कृष्ट सागवानासाठी प्रसिद्ध असलेल्या आलापल्ली डेपोतील उच्च प्रतिच्या सागवान लाकडांचा वापर केला जाणार आहे. यासाठी लार्सन ॲन्ड टुब्रो कंपनीचा चमू आलापल्लीत दाखल झाला आहे.

आलापल्लीच्या जंगलातील उच्च प्रतिचे सागवान देशात प्रसिद्ध आहे. राम मंदिर ट्रस्टने आणि या मंदिराची उभारणी करत असलेल्या लार्सन ॲन्ड टुब्रो कंपनीच्या चमूने देशाच्या इतरही काही भागातील सागवानाची चाचपणी केली. पण राम मंदिराच्या उभारणीत लागणाऱ्या दरवाजे आणि खिडक्यांसाठी अपेक्षित दर्जाचे सागवान त्यांना मिळाले नाही. आलापल्ली येथील महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या डेपोतील (एफडीसीएम) सागवान मात्र त्यांच्या पसंतीस उतरले आहे. या चमूने लाकडांचा दर्जा तपासून उत्कृष्ट असणाऱ्या लाकडांची निवड करणे सुरू केले आहे. माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनीही आलापल्लीच्या आरामशीनला भेट देऊन लाकडांची पाहणी करत चमूला मार्गदर्शन केले. देशवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या राम मंदिरासाठी आपल्या भागातील लाकडांची निवड होणे ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

नक्षीकामासाठी होणार वापर

आलापल्लीतील सागवानाचा वापर ४५ दरवाजे-खिडक्यांसाठी तसेच राम मंदिराच्या पहिल्या माळ्यावरील धार्मिक चिन्हे कोरण्यासाठी केला जाणार आहे. त्यासाठी हव्या त्या आकारात सागवान कापून ते अयोध्येला नेले जाणार आहे. आलापल्ली येथील वन विभागाचा सागवान डेपो आणि आरामशीन ब्रिटिशकालीन आहे. यापूर्वी अनेक महत्त्वाच्या ठिकाणी येथील सागवानाचा उपयोग करण्यात आला आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर