शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी बनविली कुत्र्याची गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 05:00 IST

शेतकऱ्याने जुन्या सायकलच्या दोन चाकांपासून एक छोटासा रिक्षा तयार केला. रिक्षाला कुत्र्याला जुंपन्याची व्यवस्था केली. सोबतच रिक्षावर स्वत:ला बसण्याची व्यवस्था केली. तेव्हापासून तो शेतकरी दररोज याच रिक्षाने कुत्र्याच्या मदतीने शेतापर्यंतचा दोन किमीचा प्रवास करीत आहे. शेतापर्यंतच्या प्रवासातून कुत्र्याला आनंद मिळत असल्याचे शेतकरी रोशन याने सांगितले.

ठळक मुद्देअनोखा रिक्षा । दररोज शेतापर्यंत मालकाला नेतो वाहून

विष्णू दुनेदार ।लोकमत न्यूज नेटवर्कतुळशी : पशुपक्ष्यांचा मानवाशी अत्यंत घनिष्ठ व जिव्हाळ्याचा संबंध आहे. मानवाने स्वत:च्या उपजीविकेसाठी पशुपक्ष्यांचा उपयोग करून घेतला आहे. यापैकी एक पशु म्हणजे कुत्रा. घराची राखण करणारा व गुन्ह्याच्या तपासणीसाठी उपयुक्त ठरणारा इमानदार प्राणी अशी कुत्र्याची ओळख आहे. देसाईगंज तालुक्यातील एका शेतकºयासाठी शिस्तप्रिय व प्रामाणिक कुत्रा प्रवासाचे साधन ठरला आहे.देसाईगंज तालुक्याच्या पिंपळगाव (हलबी) येथील शेतकरी रोशन मेश्राम यांनी आपल्या घरी जर्मन शेपर्ड जातीचे कुत्र्याचे पिल्लू पाळले. कुत्र्याचे पिल्लू अवघा एक महिन्याचे असल्यापासून त्यांनी त्याचे संगोपन केले व चांगली शिस्त लावली. कुटुंबात टॉमी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कुत्र्याला लहानपणापासूनच ते नित्यनेमाने सकाळी-संध्याकाळी शेतावर फिरायला घेऊन जायचे. आज टॉमी दोन वर्षाचा आहे. कुत्रा मोठा झाल्यावर मोटारसायकल सोबत त्याला लोखंडी साखळी बांधून घेऊन जायचे. यावेळी मात्र हा कुत्राच स्वत: मोटारसायकला ओढत न्यायचा. यामुळे पेट्रोलची बचत व्हायची. जर त्याला गाडी ओढू दिली नाही तर तो खूप भूंकायचा. ओढू दिली तर त्याला आनंद व्हायचा. हाच प्रकार त्याच्या सोबत सायकलने प्रवास करताना व्हायचा.याच कल्पनेतून मग त्या शेतकऱ्याने जुन्या सायकलच्या दोन चाकांपासून एक छोटासा रिक्षा तयार केला. रिक्षाला कुत्र्याला जुंपन्याची व्यवस्था केली. सोबतच रिक्षावर स्वत:ला बसण्याची व्यवस्था केली. तेव्हापासून तो शेतकरी दररोज याच रिक्षाने कुत्र्याच्या मदतीने शेतापर्यंतचा दोन किमीचा प्रवास करीत आहे. शेतापर्यंतच्या प्रवासातून कुत्र्याला आनंद मिळत असल्याचे शेतकरी रोशन याने सांगितले.अशी घेतो काळजीसकाळीच कुत्र्याला बाहेर शौचास घेऊन जातो. रोज नित्यनेमाने आंघोळ घालतो. घरात जे शिजेल ते अन्न त्याला देतो. घरातील एक सदस्याप्रमाणे त्याची काळजी रोशन व त्याचे कुटूंबिय घेतात. प्राण्यावर जेवढे प्रेम कराल, तेवढेच प्रेम प्राणी करतात असा अनुभव रोशन कथन करतो.

टॅग्स :Farmerशेतकरीdogकुत्रा