लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अस्थायी बीएएमएस वैद्यकीय अधिकाºयांची सेवा समावेशन करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना शाखा गडचिरोलीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांची भेट घेतली व त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. निवेदनात म्हटले आहे की, बीएएमएस वैद्यकीय अधिकाºयांच्या रास्त मागण्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या उदासीनतेमुळे गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित आहेत. राज्यभरात ७८९ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी १२ वर्षांपासून अस्थायी स्वरूपात काम करीत आहेत. या डॉक्टरांना कोणताही शासकीय लाभ मिळत नाही, त्यामुळे न्याय देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष डॉ. माधव नलोडे, उपाध्यक्ष डॉ. सुरेश दामले, कोषाध्यक्ष डॉ. संजय सुपारे, सचिव डॉ. पंकज हेमके, उमाकांत मेश्राम, डॉ. नारायण कर्रेवार, डॉ. गुरूदेव मस्के यांच्यासह अन्य बीएएमएस डॉक्टर उपस्थित होते. यावेळी चर्चा करण्यात आली.
अस्थायी डॉक्टरांचे समावेशन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 20:55 IST
गडचिरोली जिल्ह्यातील अस्थायी बीएएमएस वैद्यकीय अधिकाºयांची सेवा समावेशन करण्यात यावी,
अस्थायी डॉक्टरांचे समावेशन करा
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : राजपत्रित वैद्यकीय अधिकारी आरडीसींंना भेटले