शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
5
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
6
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
7
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
8
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
9
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
10
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
11
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
12
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
13
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
14
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
15
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
16
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
17
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
18
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
19
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
20
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!

काम बंद आंदोलन करून डॉक्टरांनी केला जि.प. अध्यक्षांचा निषेध

By admin | Updated: October 27, 2015 01:26 IST

मुलचेरा तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संभाषण

गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संभाषण करून पदाला न शोभणारी अभद्र चर्चा केल्याच्या निषेधार्थ जि.प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांचा राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी कामबंद आंदोलन करून निषेध करण्यात आला. जिल्ह्यातील ५०० वर अधिक डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आदींना वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने निवेदन देऊन जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय आकोलकर, सचिव सुनिल मडावी, कार्याध्यक्ष डॉ सचिन हेमके, जिल्हा मॅग्मो आयुर्वेद संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. माधव नलोडे, अस्थायी वैद्यकीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. हिमांशू म्हस्के, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र खरवडे, विनोद सोनकुसरे, औषध निर्माण अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विवेक मून, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संघटनेचे जिल्हाध्यक्ष शैलेश जांभुळे, नर्सेस संघटनेच्या जिल्हाध्यक्ष माया सिरसाट आदींनी केले. या आंदोलनात डॉ. नंदकुमार माळाकोळीकर, डॉ. दिलीप कांबळे, डॉ. किशोर वाघ, डॉ. रवींद्र चौधरी, डॉ. बिटपल्लीवार, डॉ. कन्नमवार, डॉ. कुमरे, डॉ. साबणे, डॉ. गजानन बुरांडे, डॉ. प्रतिभा बांगर, डॉ. देवगडे, वेलदंडी, हरिदास कोटरंगे, नितीन बालमवार, कल्पना रामटेके, कांबळे, सुरेश गेडाम, रायपुरे, भटारकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)