शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

घंटानादने कार्यालयांचा परिसर दणाणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 01:28 IST

कोरेगाव (भीमा) हल्ल्याप्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी, बहुजन बांधवांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे आदींसह विविध मागण्यांकरिता भारिप बहुजन महासंघाच्या वतीने गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी येथे घंटानाद आंदोलन मंगळवारी करण्यात आले.

ठळक मुद्देगडचिरोली, चामोर्शी, आरमोरीत भारिप-बमसंचे आंदोलन : कोरेगाव भीमा हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/चामोर्शी/आरमोरी : कोरेगाव (भीमा) हल्ल्याप्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी, बहुजन बांधवांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे आदींसह विविध मागण्यांकरिता भारिप बहुजन महासंघाच्या वतीने गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी येथे घंटानाद आंदोलन मंगळवारी करण्यात आले. जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.गडचिरोली - भारिप बमसंचे प्रदेश निरीक्षक रोहिदास राऊत यांच्या नेतृत्त्वात गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पक्षाच्या शिष्टमंडळाने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी वासनिक यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या आंदोलनात भारिप बमसंचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम टेंभुर्णे, महिला आघाडी अध्यक्ष माला भजगवळी, सहसचिव प्रा. राजन बोरकर, प्रकाश रायपुरे, अशोक खोब्रागडे, प्रल्हाद रायपुरे, कवडू उंदीरवाडे, जी. के. बारसिंगे, राहुल दुर्गे, प्रशील रामटेके, देवानंद मेश्राम, प्रफुल नागापुरे, सपना रामटेके, सीमा पोट्टाला, सुमित्रा राऊत, कांता ढवळे, रोशना शिंपी, प्रीती बांबोळे, अर्चना टेंभुर्णे, पुष्पा भनारकर, सुनंदा चौधरी, सुकेशनी करवाडे, मनीषा वाकडे, अंजली साखरे, सपना भैसारे आदी उपस्थित होत्या.आरमोरी - भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा संघटक हंसराज बडोले यांच्या नेतृत्त्वात येथील तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक हंसराज बडोले, तालुकाध्यक्ष भीमराव ढवळे, केशव बांबोळे, रोहिदास बोदेले, सुरेश कांबळे, विनोद शेंडे, महादेव सहारे, प्रकाश मुलमुले, कुमता मेश्राम, लता बारसागडे, किरण बांबोळे, नीलेश मेश्राम, सूरज टेंभुर्णे, विश्वनाथ खोब्रागडे, प्रवीण रहाटे, श्रीरंग खोब्रागडे, धम्मानंद मेश्राम, लक्ष्मण जांभुळकर, जगदीश रामटेके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ देण्यात यावी, ओबीसी व विजेएनटी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट पूर्ववत ठेवावा, गरजू लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करावी, रोहयोची कामे सुरू करावी, शेतकºयांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा, आरमोरी शहरातील पाणी टंचाई लक्षात घेऊन नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. निवेदन वडसाचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांनी स्वीकारले.चामोर्शी - भारिप बहुजन महासंघ शाखा चामोर्शीच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. तहसीलदारांकडे निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, चामोर्शी तालुक्यातील मुरखळा चक ग्राम पंचायत इतर बारा ग्राम पंचायतीमधील वंचित लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास, रमाई आवास व शबरी आवास योजनेंतर्गत तत्काळ घरकूल मंजूर करण्यात यावे. तालुक्यातील एससी, एसटी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लावावा आदी मागण्यांचा समावेश आहे.निवेदन देताना भारिप बमसंचे चामोर्शी तालुकाध्यक्ष शैलेश बांबोळे, जिल्हा कार्याध्यक्ष पुनेश्वर दुधे, संघटक पुरूषोत्तम उंदीरवाडे, जिल्हा सल्लागार, प्रल्हाद दुबे, दिलीप वनकर, सिकदर चुनारकर, एन. पी. वाळके, एस. पी. उंदीरवाडे, कल्पना सहारे, राजर्श्री सहारे, प्रतिमा साखरे, बी. ए. सोरते, मनीषा बांबोळे, आशा मुळे, बेबीनंदा वनकर, प्रकाश राऊत, ज्योत्स्ना कावळे, सिद्धार्थ रायपुरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.आंदोलनादरम्यान भारिप बमसंच्या पदाधिकाºयांनी विद्यमाने सरकारच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली. केंद्र व राज्य सरकारने मागासवर्गीय लोकांच्या व विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे प्राधान्याने लक्ष देऊन न्याय दिला पाहिजे, असे भाषणात सांगितले. गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकातून भारिपचे पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारच्या सुमारास धडकले.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव