शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

शस्त्रक्रियेत डॉक्टर कुंभारेंनी फसवणूक केली

By admin | Updated: September 25, 2016 01:45 IST

गडचिरोली येथील चामोर्शी मार्गावरील धन्वंतरी या खासगी बड्या रूग्णालयाचे डॉ. अनंत शिवनाथ कुंभारे यांनी आपल्या आई सरस्वती शामसुंदर भोयर यांच्या मूत्राशयावर चुकीची शस्त्रक्रिया केली

वामन भोयर यांचा आरोप : आईच्या मूत्राशयाचे केले आॅपरेशनगडचिरोली : गडचिरोली येथील चामोर्शी मार्गावरील धन्वंतरी या खासगी बड्या रूग्णालयाचे डॉ. अनंत शिवनाथ कुंभारे यांनी आपल्या आई सरस्वती शामसुंदर भोयर यांच्या मूत्राशयावर चुकीची शस्त्रक्रिया केली व यासाठी आपल्याकडून भरपूर आर्थिक रक्कमही वसूल केल्याचा आरोप वामन शामसुंदर भोयर रा. कसरगाव ता. सावली जि. चंद्रपूर यांनी गडचिरोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. वामन शामसुंदर भोयर यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, ६ जुलै रोजी डॉ. अनंत शिवनाथ कुंभारे यांच्या खासगी धन्वंतरी क्लिनिकमध्ये माझ्या आईची सोनोग्राफी करण्यात आली. या सोनोग्राफीमध्ये ४ हजार ८७ एमएमची गाठ असल्याचे सांगून सदर गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, असे डॉक्टर अनंत कुंभारे यांनी सांगितले. त्यानुसार १७ जुलै रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान गाठ आढळून आली नाही. तर मूत्राशयातून तीन ते चार लिटर लघवी बाहेर काढण्यात आली. औषधोपचार झाल्यानंतर २३ जुलै रोजी रूग्णालयातून सुटी करण्यात आली. घरी नेल्यानंतर नळीद्वारे लघवी काढणे सुरू होते. मात्र २४ ते २५ जुलैदरम्यान लघवी नळीद्वारे निघणे बंद झाले. त्यामुळे पुन्हा २६ जुलै रोजी रात्री १० वाजता डॉ. कुंभारे यांच्या रूग्णालयात आईला भरती करण्यात आले. डॉक्टरांनी दुसरी नळी बदलवून दिली. तेव्हापासून नळीद्वारेच लघवी काढणे सुरू झाले. आॅपरेशन झाल्यानंतरही प्रकृतीमध्ये कोणतीच सुधारणा झाली नाही. अजुनही नळीद्वारेच लघवी काढावी लागत आहे.आॅपरेशन करून देण्याचा एकूण खर्च २२ हजार रूपये ठरविण्यात आला होता. मात्र २६ जुलै रोजी पुन्हा भरती केल्यानंतर डॉक्टर कुंभारे यांनी आणखी ६ हजार १०० रूपयांचा बिल तयार केला. मात्र तडजोड करून पाच हजार रूपये त्यांनी घेतले. सुरूवातीचे २२ हजार व नंतरचे पाच हजार असा एकूण २७ हजार रूपये रूग्णालयाचा खर्च व औषधांवरील खर्च पकडून आजपर्यंत लाख रूपये खर्च झाले आहेत. मात्र प्रकृती सुधारणा झाली नाही. डॉ. अनंत कुंभारे यांनी आपली फसवणूक केली आहे. त्याचबरोबर या कालावधीत आपल्याला बराच आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे डॉ. अनंत कुंभारे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वामन भोयर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केली आहे. (नगर प्रतिनिधी)मागील दोन ते तीन वर्षांपासून सरस्वती भोयर यांना लघवी न होण्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून चार लिटर पाण्याचा गोळा बाहेर काढण्यात आला. शस्त्रक्रियेनंतरही किमान पाच ते सहा महिने नळीद्वारेच लघवी बाहेर काढावी लागली. हे आपण वामन भोयर यांना चांगल्या पध्दतीने समजावून सांगितले होते. सहा महिन्यानंतर मूत्राशयाचे आणखी आॅपरेशन करून छिद्र थोडा मोठा केला जाईल. त्यानंतर लघवी होणे सुरू होईल, असे सांगण्यात आले. सरस्वती भोयर या ६५ वर्षांच्या आहेत. म्हातारपणामुळे त्यांच्या मूत्राशयाच्या संवेदना संपल्या आहेत. त्या पुन्हा आणणे कठीण आहे. संवेदना संपल्या असल्याने लघवी लागली असल्याची जाणीव त्यांना होत नाही. शस्त्रक्रियेचा खर्च म्हणून २२ हजार रूपये आकारण्यात आले असले तरी शस्त्रक्रियेच्या मानाने तो खर्च अधिक नाही. - डॉ. अनंत शिवनाथ कुंभारे, धन्वंतरी रूग्णालय गडचिरोली