शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सर्पमित्राला बोलावण्यासाठी पैसे द्यावे लागतात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:02 IST

Gadchiroli : अवैधरित्या साप पकडण्याच्या प्रकाराला जिल्ह्यात ऊत

गडचिरोली : सर्पमित्रांच्या नावावर अवैधरित्या साप पकडण्याच्या प्रकाराला शहरासह जिल्ह्यातही ऊत आलेला आहे. अनेक स्वयंभू सर्पमित्र शहरासह गावांमध्ये मिरवतात. साप पकडल्याच्या मोबदल्यात पैसे मागतात. साप कोणत्या प्रकारचा आहे किंवा साप पकडण्याकरिता येण्यासाठी किती अंतर प्रवास करावा लागला यावरून त्याचा पैशांचा दर ठरतो. त्यामुळे पैसे पकडण्यासाठी सर्पमित्राला पैसे द्यायचे हा प्रश्न पडतो. 

शहरात किती सर्पमित्रांची नोंद गडचिरोली शहरातही बहुसंख्य सर्पमित्र आहेत. यापैकी ५ ते ७ सर्पमित्र नोंदणीकृत आहेत. बहुतांश साप पकडणारे व्यक्त्ती स्वतःला स्वयंभू सर्पमित्र समजतात.

साप दिसल्यास कोणाला माहिती द्यावी? मानवी वस्तीत अनेकदा साप शिरतो. पावसाळ्यासह हिवाळ्यातही ही समस्या उद्भवते तेव्हा सापाला पकडण्यासाठी किंवा हाकलून लावण्यासाठी कोणाला कळवावे, असा प्रश्न पडतो.

स्थानिक वन कर्मचारी येतात का? एखाद्या गावात किंवा वस्तीत साप दिसल्यास त्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविल्यास ते येत नाहीत. त्यामुळे अनेकजण सापाला जिवंत मारतात किंवा सर्पमित्राला बोलावितात. 

अनेकजण मागतात पेट्रोल खर्च साप पकडण्यासाठी अनेक सर्पमित्र पेट्रोल खर्च म्हणून २०० ते ३०० रुपये संबंधित व्यक्तीकडून मागतात. अनेकजण स्वखुशीने सुद्धा त्यांचा मेहनताना देतात. 

सापांची मान पकडता येणे म्हणजे, सर्पमित्र नव्हे ! "एखाद्या व्यक्तीला सापाची मान, शेपटी पकडता येते, तेव्हा तो स्वतःला सर्पमित्र समजतो. साप अटॅक कसा करतो. त्यापासून आपण कसा बचाव करू शकतो. सापांचे विष व त्यांचे प्रकार यासह सापांविषयी इत्यंभूत माहिती व अभ्यास असणे आवश्यक आहे. याशिवाय समाजाला निःशुल्क सेवा देता आली पाहिजे." - मिलिंद उमरे, मानद वन्यजीव रक्षक, गडचिरोली

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीsnakeसाप