वृक्षारोपणासाठी जिल्ह्यातील दिग्गजही सरसावलेगडचिरोली जिल्हा परिषदेच्या आवारात वृक्षारोपण करताना जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, तर गडचिरोली पोलीस मुख्यालयात वृक्षारोपण करताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुुख , मुख्यालय परिसरात पोलीस प्रशासनातर्फे विविध जातीची ४०० झाडे लावण्यात आली तर गडचिरोली नगर पालिकेच्या वतीने शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. या दिंडीत नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक (यादव) या उपस्थित होत्या. त्यानंतर पालिकेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. संपूर्ण जिल्हाभर साडेपाच लाखांवर वृक्षांची लागवड लोकसहभागातून एकाच दिवशी करण्यात आली. वृक्षारोपण कार्यक्रमात वन विभागासह शासनाचे सर्व विभाग, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
वृक्षारोपणासाठी जिल्ह्यातील दिग्गजही सरसावले
By admin | Updated: July 2, 2016 01:27 IST