शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. सभापती व कंत्राटदारातील वादात चार गावातील पाणी योजना रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2015 01:45 IST

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात शासनाचा कोट्यवधी रूपयांचा निधी, नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी येतो.

कंत्राटदारही त्रासले : साहित्य व कामाच्या दर्जावरून तक्रार करण्याचा नवा फंडा गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात शासनाचा कोट्यवधी रूपयांचा निधी, नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी येतो. मात्र या निधीचा विनियोग लावण्याच्या कामात स्वत: लोकप्रतिनिधीच ठेकेदार बनून पुढाकार घेत असल्याने ऐन उन्हाळ्याच्या काळात गडचिरोली तालुक्यातील चार गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतीच्या मतदार संघातही अशीच परिस्थिती आहे. कंत्राटदार व सभापती यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीवरून प्रचंड वाद झाल्याने हे काम रखडल्याचे येथील नागरिकांनी ‘लोकमत’ला दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये सांगितले आहे.गडचिरोली तालुक्यातील पोर्ला, दिभना, राजगाटा, धुंडेशिवणी या चार गावांतील पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. सुरुवातीला या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या जिल्हा परिषद सभापतीने स्वत:च हे काम करण्यासाठी रस दाखविला. कंत्राटदाराच्या नावावर आपली माणसे लावून हे काम पूर्णत्वास नेण्याचा त्यांनी घाट घातला होता. योजनेचे काम सुरू करण्यासाठी स्वत:चा धनादेशही पाईप पुरवठादाराला देण्याचा प्रकार सुद्धा येथे घडलेला आहे. हा धनादेश बाऊंस झाल्याच्या कारणावरून सध्या न्यायालयात खटलाही दाखल झाला असल्याची माहिती पोर्ला येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली. या गावातील पाणी योजनांचे काम कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार संबंधित विभागाकडे करायची. त्यानंतर कंत्राटदाराचे बिल रोखायचे व कंत्राटदाराला आपल्या समोर लोटांगण घालायला लावल्यावर स्वत:च पुढाकार घेऊन त्याचे बिल काढून देण्यासाठी आर्थिक लाभ पदरात पाडून घ्यायचा हा नवा फंडा या महोदयांनी चालविला आहे. यामुळे काम ज्याच्या नावावर घेण्यात आले आहे तो कंत्राटदारही त्रस्त होऊन अखेरीस कामाला विलंब लावत आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात या सर्व गावातील महिलांची पाण्यासाठी प्रचंड पायपीट होत असल्याचे ‘लोकमत’ने या गावांना भेट दिल्यावर दिसून आले. पोर्ला येथील ग्राम पंचायतीच्या गोदामातून पाईपही सभापतींच्या आदेशावरच गावातील एका प्रतिष्टीत इसमाच्या घरात लपवून ठेवण्यात आले, असा प्रकारही उघडकीस आला आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद यंत्रणेने व पोर्ला ग्राम पंचायतीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची गरज आहे. मात्र या दोन्ही यंत्रणा याप्रकरणी गप्प आहे. यासंदर्भात बुधवारी लोकमत ने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता जी. डी. बारापात्रे यांना विचारणा करण्यासाठी संपर्क साधला. तर बारापात्रे यांनी मी सध्या कामाच्या साईडवर आहे. त्यामुळे आपल्याशी बोलू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली व त्यांनी संबंधित तिन्ही गावच्या पाणीपुरवठा योजनांचे काम पाहणारे अभियंता झाडे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला. झाडे यांना वारंवार संपर्क केला. मात्र झाडे यांनी प्रतिसाद दिला नाही. एकूणच सभापतीच्या दहशतीमुळे पाणीपुरवठा विभागाची यंत्रणाही घाबरलेली आहे, असे चित्र आहे. कमिशनच्या हव्याशापोटी पोर्ला, राजगाटा चक, धुंडेशिवणी, दिभना येथील नागरिकांना पाण्यासाठी वनवण फिरावे लागत आहे. पोर्ला गावात या सभापतीच्या कार्यकाळात झालेल्या सर्व विकास कामांची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)भूमिपूजन नव्या कामाचे मात्र दुरूस्ती जुन्या विहिरीची जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने गडचिरोली उपविभागामार्फत पोर्ला येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुरूस्तीच्या कामात नदीपात्रात नवीन विहीर बांधण्याचे अंदाजपत्रकात समावेश आहे. या संपूर्ण कामासाठी २९ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र संबंधित कंत्राटदाराने वसा वैनगंगा नदीघाटाच्या पात्रात अशी कुठलीही नवी विहीर बांधली नसल्याचे प्रत्यक्ष भेटीदरम्यान दिसून आले. जुन्या विहिरीची दहा ते बारा मीटर उंची वाढवून १९ लाख रूपयांचा खर्च दाखविण्यात आला. सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने पोर्लावासीयांना भविष्यात पाणीसंकट भेडसावणार आहे. विशेष म्हणजे या योजनेतील नव्या विहीर बांधकामाचे भूमीपूजन खुद्द जिल्हा परिषदेचे या क्षेत्राचे सदस्य व समाजकल्याण सभापती विश्वास भोवते यांनी स्वत:च केले होते. त्यानंतरही असा प्रकार घडला, यावर मात्र त्यांनी मौन बाळगले आहे.दिव्याखालीच अंधारस्वत:च्या मतदार संघातील अनेक विकास कामे निकृष्ट दर्जाचे झालेले असताना ते झाकून इतरांच्या मतदार संघातील पाणी पुरवठा योजना व इतर विकास कामांची तक्रार करून जिल्हाभरातील कंत्राटदारांवर दबाव आणण्याचे काम जिल्हा परिषदेचे सदर लोकप्रतिनिधी करीत असल्याचे मतदार संघातील कामांची पाहणी केल्यावर स्पष्टपणे दिसून येते हे विशेष.कंत्राटदार नॉटरिचेबलपोर्ला येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे कंत्राट अशोक रागीवार यांनी घेतला. लोकमतने दोन दिवसांपूर्वी या पाणीपुरवठा योजनेसंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. बुधवारी रागीवार यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्यात आला. मात्र त्यांचा भ्रमणध्वनी नॉटरिचेबल असल्याचे दिवसभर दिसून आले. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया याप्रकरणी मिळू शकली नाही.