शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

जिल्ह्यात २३२ नवीन कुष्ठरुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 23:49 IST

कुष्ठरोग विभागाच्या सहायक संचालक कार्यालयाकडून २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर या कालावधीत कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यात २३२ नवीन कुष्ठरुग्णांची भर पडल्याचे आढळले. अजून काही नमूने तपासायचे बाकी आहेत.

ठळक मुद्देशोधमोहिमेत सहा हजार संशयित : पूर्ण तपासणीनंतर रुग्णांची संख्या आणखी वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कुष्ठरोग विभागाच्या सहायक संचालक कार्यालयाकडून २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर या कालावधीत कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यात २३२ नवीन कुष्ठरुग्णांची भर पडल्याचे आढळले. अजून काही नमूने तपासायचे बाकी आहेत. सदर नमुने तपासल्यानंतर रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कुष्ठरोगावर प्रभावी उपाय शोधण्यात आले आहेत. अगदी प्राथमिक स्थितीत कुष्ठरोगावर उपचार झाल्यास विकृती टाळता येते. विशेष म्हणजे कुष्ठरोगावरील उपचार शासकीय दवाखान्यांमध्येच होत असल्याने सदर उपचार नि:शुल्क आहे. शरीरावरील पांढऱ्या रंगाचा असंवेदनशील चट्टा हा कुष्ठरोग ओळखण्याचे एकमेव लक्षण आहे. अशा प्रकारचा चट्टा आढळून आल्यास जवळपासच्या रुग्णालयात संपर्क साधण्याबाबत जनजागृती करण्यात येत असली तरी ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना याची माहिती राहत नाही. परिणामी कुष्ठरोगाचा आजार वाढत जातो.आशा वर्कर, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्या मार्फत कुष्ठरोग शोधण्यासाठी राज्यभरात २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर यादरम्यान कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली होती. या कर्मचाºयांनी घरोघरो जाऊन प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची तपासणी केली. या तपासणी मोहिमेदरम्यान सुमारे सहा हजार संशयीत कुष्ठरुग्ण आढळून आले. त्यांचे रक्त नमूने घेण्यात आले. त्यापैकी तीन हजार नागरिकांच्या रक्त नमून्यांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये २३२ जणांना कुष्ठरोग झाल्याचे आढळून आले आहेत. अजून तीन हजार रक्त नमूने तपासयचे आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या ५०० च्या वर जाण्याची शक्यता कुष्ठरोग अधिकाºयांकडून व्यक्त केली जात आहे.या विशेष मोहिमेशिवाय तालुकास्तरावरील कुष्ठरोग तंत्रज्ञ सुद्धा शोधमोहीम राबवित असतात. यादरम्यान एप्रिल ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ४४० रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गडचिरोली शहरात शोधमोहीम राबवायची आहे. यासाठी ४० जणांची टीम तयार करण्यात आली आहे. २९ आॅक्टोबरपासून गडचिरोली शहरात शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.वैनगंगा नदीलगतच्या गावांमध्ये प्रभावगडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील जी गावे वैनगंगा नदीला लागून आहेत, अशा गावांमध्ये कुष्ठरोगींची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. त्या तुलनेत जंगलव्याप्त व आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये कुष्ठरोगाचे प्रमाण अतिशय कमी आहे. चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक कुष्ठरोगाचे रुग्ण आढळतात. नुकत्याच झालेल्या शोधमोहिमेदरम्यानही सुमारे ६० रुग्ण आढळून आले आहेत. वैनगंगा नदीला लागून असलेल्या गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज या तालुक्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येतात.प्रभावी उपचार उपलब्धकुष्ठरोगावर शासकीय रुग्णालयांमध्ये प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. पाचपेक्षा कमी चट्टे असलेल्या रुग्णाला सहा महिन्यांचा औषधोपचार दिला जातो. तर पाचपेक्षा अधिक चट्टे आढळून आल्यास १२ महिन्यांचा औषधोपचार दिला जातो. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात कुष्ठरोग रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कुष्ठरोगाबाबत गडचिरोली जिल्हा संवेदनशील मानला जातो. कुष्ठरोगाबाबत पूर्वी चुकीच्या समजुती समाजात होत्या. जनजागृतीमुळे या गैरसमजुती कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर चट्ट्यांची लक्षणे आढळून आल्याबरोबर उपचार होत असल्याने विकृतीपर्यंत रुग्ण पोहोचत नाही.कुष्ठरोगावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. पांढºया रंगाचा असंवेदनशील चट्टा आढळून आल्यास नागरिकांनी जवळपासची आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी, तपासणीदरम्यान कुष्ठरोग आढळून आल्यास त्यावर मोफत उपचार केले जातात. चट्ट्यांबाबत नागरिकांनी दक्ष असणे आवश्यक आहे.- डॉ.अमित साळवे, वैद्यकीय अधिकारी,सहायक संचालक कुष्ठरोग, गडचिरोली

टॅग्स :Healthआरोग्य