शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पुन्हा मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:05 IST

गुरूवारी रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा नदी, नाल्यांना पूर येण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. रात्री शहरात पाणी शिरण्यास सुरूवात झाल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

ठळक मुद्देभामरागडात शिरले पाणी : नदी, नाल्यांची पाणी पातळी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गुरूवारी रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा नदी, नाल्यांना पूर येण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. रात्री शहरात पाणी शिरण्यास सुरूवात झाल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली आहे. बुधवारी व गुरूवारी दुपारी पावसाचा जोर ओसरला होता. त्यामुळे नदी, नाल्यांच्या पाण्याची पातळी कमी झाली होती. मात्र पुन्हा गुरूवारी रात्रीपासून काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी नाल्यांची पातळी वाढण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. सतत पाऊस सुरू असल्याने रोवण्याच्या कामांवरही परिणाम झाला आहे. आलापल्ली-भामरागड मार्गावरील कुमरगुडा नाल्याच्या पुलावर पूर वाहण्यास सुरूवात झाल्याने आलापल्ली-भामरागड मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. वैनगंगा नदी व तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.वीज पडून तीन महिला जखमीदेसाईगंज : रोवणीची काम करीत असताना वीज पडल्याने आमगाव येथील तीन महिला जखमी झाल्या. दुसऱ्या एका घटनेत देसाईगंज येथील दोन म्हशी ठार झाल्या. सुनिता मोहन चौधरी (३०), शकुंतला श्रावण चौधरी (५५), विशाखा महेश निकोडे सर्व रा. आमगाव अशी जखमींची नावे आहेत. आमागाव येथील महेश रामजी निकोडे यांच्या शेतात रोवणीचे काम सुरू होते. शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान वीज कोसळली. यामध्ये तिघींनाही जबर झटका बसला. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रूग्णालय देसाईगंज येथे भरती करण्यात आले. पुढील उपचासाठी जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले आहे. त्याच वेळेला देसाईगंज येथील हनुमान वार्डातील रहिवासी शंकर मैंद यांच्या दोन म्हशींवर वीज कोसळल्याने ठार झाल्या. 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर