कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, प्र.सो. गुंडावार, विजय पालारपवार, बबन आईंचवार, आनंद गण्यारपवार, पराग आईंचवार, लोमेश बुरांडे उपस्थित होते.
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने हेल्पिंग हँड्स संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ देण्यात आला. हा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली. या संस्थेच्या वतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम हे प्रेरणादायी आहेत, असे गौरवाेद्गार पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांनी काढले.
कार्यक्रमासाठी हेल्पिंग हँड्स संस्थेचे अध्यक्ष अमृत आईंचवार, लीला आईंचवार, सोनाली पालारपवार, श्वेता पालारपवार, प्राची भिवापुरे, रजनी मस्के, वर्षा भांडारवार, कविता बंडावार, मंगला कोहळे यांनी सहकार्य केले.
बाॅक्स
तीन वर्षांपासून विविध उपक्रम
चामाेर्शी येथे मागील ३ वर्षांपासून हेल्पिंग हँड्स संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये दुर्गम व ग्रामीण भागातील लोकांना कपडे वाटप, ‘मूठभर धान्य गरिबांसाठी’ या नवरात्रीमधील उपक्रमाला तर महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. गरिबांची दिवाळी या कार्यक्रमांतर्गत अनाथ व गरजू मुलांना मार्कंडादेव यात्रेत झुल्यावरची सैर, चटपटीत खाऊ व गोष्टींच्या पुस्तकांचे वितरण, मूकबधिर शाळेत मुलांना ब्लँकेट वाटप, भामरागड येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य वितरण, कोरोना काळात माक्स, जीवनावश्यक वस्तू वाटप, आरोग्य तपासणी व मोफत औषधी वितरण यासह विविध उपक्रम राबविण्यात आले.
210721\img-20210721-wa0179.jpg
चामोशीत शालेय साहित्याचे वितरण करताना मान्यवर फोटो