कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रशाला गेडाम हेात्या. प्रमुख मार्गदर्शक डॉ. सूर्यप्रकाश गभने, स्नेहल पवार उपस्थित होते. शास्त्रशुद्ध माहिती देत पौगंडावस्थेत होणारे शारीरिक, भावनिक बदल, पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी, आहार, स्वच्छतेच्या सवयी, शोषक साहित्याचा वापर व विल्हेवाट याविषयी हसतखेळत माहिती देण्यात आली. शिवाय पाळीविषयी समाजात असणारे गैरसमज व अंधश्रद्धा दूर करत पाळीविषयी शास्त्रीय दृष्टिकोन तयार करण्यावर सत्रात भर देण्यात आला. सत्रानंतर प्रायोजक आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टमार्फत मुलींना मोफत पॅडचेही वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद हायस्कूल व राधेश्यामबाबा विद्यालय येथील साठ मुली यात सहभागी झाल्या. प्रास्ताविक डॉ. सूर्यप्रकाश गभने यांनी केले, संचालन आरती पुराम तर आभार रोहिणी सहारे यांनी मानले. यशस्वितेसाठी अर्चना उईके, सुनील रेहपाडे यांनी सहकार्य केले.