शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

खंडीवासीयांना साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोनावने यांच्या मार्गदर्शनाखाली नारगुंडा पोेलीस मदत केंद्राच्या हद्दीतील खंडी येथे शनिवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पोलीस विभागाकडून लग्न व इतर सामूहिक कार्यक्रमासाठी आवश्यक असणारी भांडी, ताडपत्री व इतर साहित्य गावाला प्रदान करण्यात आले. बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याची सुरूवात करण्यात आली.

ठळक मुद्देआरोग्य तपासणी : जनजागरण मेळाव्यात दिली शासकीय योजनांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोनावने यांच्या मार्गदर्शनाखाली नारगुंडा पोेलीस मदत केंद्राच्या हद्दीतील खंडी येथे शनिवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पोलीस विभागाकडून लग्न व इतर सामूहिक कार्यक्रमासाठी आवश्यक असणारी भांडी, ताडपत्री व इतर साहित्य गावाला प्रदान करण्यात आले.बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याची सुरूवात करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक सुरेंदरसिंग होते. प्रमुख अतिथी म्हणून खंडी येथील गावपाटील कटीया, नैनवाडीचे गावपाटील बाजीराव मडावी, पोलीस उपनिरीक्षक खडके, वनवे, अंगणवाडी सेविका रजनी कुड्यामी, आरोग्यसेवक पुरूषोत्तम कुमरे, आरोग्य विभागाचे निरीक्षक भुजाळे, प्रकल्पाचे संघटक कुळसंगे आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस विभागामार्फत राबविण्यात येत असलेली नक्षल गावबंदी योजना, आत्मसमर्पण योजना व ‘द्या माहिती, व्हा लखपती’ आदी योजनांची माहिती दिली. याशिवाय महसूल विभाग, महावितरण व पंचायत समितीमार्फत नागरिकांसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या शासकीय योजनांची विस्तृत माहिती देण्यात आली. याप्रसंगी चेन्नई येथे एमडीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विनोद एक्का या स्थानिक आदिवासी युवकाने शासनाच्या सर्व योजना उपस्थित आदिवासी बांधवांना माडीया भाषेत समजावून सांगितले. याप्रसंगी आरोग्य विभागामार्फत महिला, लहान मुले व वृद्धांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आदिवासी विकास विभागाच्या निरीक्षकांनी आदिवासींसाठी असलेले घरकूल व इतर योजनांची माहिती देऊन लाभ देण्याचे आवाहन केले.सदर मेळाव्यादरम्यान खंडीगावाला लग्न व इतर कार्यक्रमासाठी आवश्यक असणारे भांडी व ताडपत्री आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. तसेच महिलांना साडी व इतरांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. सामूहिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.संचालन पोलीस उपनिरीक्षक वनवे यांनी केले. यशस्वीतेसाठी जिल्हा पोलीस, सीआरपीएफ व एसआरपीएफचे अधिकारी व जवानांनी सहकार्य केले. सदर मेळाव्याला खंडीगावातील तसेच परिसरातील २०० वर नागरिक उपस्थित होते.हस्तकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरवपोलीस विभागातर्फे प्रत्येक पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे, मदत केंद्रस्तरावर राणी दुर्गावती महिला हस्तकला स्पर्धा आयोजित केली जात आहे. नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या वतीने खंडी येथे झालेल्या जनजागरण मेळाव्यादरम्यान राणी दुर्गावती हस्तकला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये कुचेर, खंडी, नैनवाडी व नारगुंडा येथील महिलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत खंडी येथील रहिवासी फुलमनी तिरकी यांनी प्रथम, नैनवाडीच्या सुमा वेळदा यांनी द्वितीय तर कुचेरच्या नानी हेडो यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. या विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे रोख तीन हजार, दोन हजार, एक हजार रुपये बक्षीस देऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया व भामरागडचे एसडीपीओ सोनावने यांच्या मार्गदर्शनाखाली हस्तकला स्पर्धा व जनजागरण मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.

टॅग्स :Socialसामाजिक