शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नागरिकांना दाखल्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 06:00 IST

महसूल विभागामार्फत सदर शिबिरात १०० लाभार्थ्यांना जातीचे दाखले, ३२ नागरिकांना राशनकार्ड, मतदान कार्डाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी आर.पी.सिडाम, संचालन व आभार जिमलगट्टाचे तलाठी सचिन मडावी यांनी मानले. आर.पी.सिडाम यांनी जातीच्या दाखल्यांपासून वंचित असणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण करून यासाठी लागणाºया कागदपत्रांची पूर्तता करून जातीचे दाखले वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.

ठळक मुद्देजिमलगट्टा येथे समाधान शिबिर : ६५ गावातील नागरिकांनी घेतला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा मंडळ कार्यालयाअंतर्गत जिमलगट्टा येथे १० फेब्रुवारी रोजी सोमवारला राजस्व अभियान समाधान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शेकडो नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरीचे नायब तहसीलदार अनिल गुट्टे होते. उद्घाटन जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिमलगट्टा येथील उपपोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सुरज निंबाळकर, ग्रामसेवक दामोधर सिडाम, उपसरपंच मदना नैताम, उमानूरचे सरपंच श्रीनिवास गावळे, डॉ.शशिकांत उपगन्लावार, संजय गज्जलवार, शाख व्यवस्थापक भाऊसाहेब भंडारीवार, महेश मद्देर्लावार, तलाठी सचिन मडावी, रावसाहेब टेकाम आदी उपस्थित होते. याप्रसंगी गायकवाड यांनी नागरिकांना शिबिराचे महत्त्व पटवून दिले. नागरिकांना मिळालेल्या जातीच्या दाखल्याचा वापर शासकीय योजनांसाठी करावा, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपला विकास साधावा, असे आवाहन गायकवाड यांनी यावेळी केले.आपल्या मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवू नका, आपले गाव व समाजाचा विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. कोणतीही अडचण आल्यास आम्ही सदैव तुमची मदत करणार, अशी ग्वाही एसडीपीओ गायकवाड यांनी दिली.महसूल विभागामार्फत सदर शिबिरात १०० लाभार्थ्यांना जातीचे दाखले, ३२ नागरिकांना राशनकार्ड, मतदान कार्डाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी आर.पी.सिडाम, संचालन व आभार जिमलगट्टाचे तलाठी सचिन मडावी यांनी मानले. आर.पी.सिडाम यांनी जातीच्या दाखल्यांपासून वंचित असणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण करून यासाठी लागणाºया कागदपत्रांची पूर्तता करून जातीचे दाखले वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली. कृषी विभागाचे भाऊसाहेब इंगळे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.एकात्मिक बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडी मार्फत बाळ कुपोषित राहू नये, यासाठी पौष्टिक आहाराचे सर्व नमूने प्रदर्शीत करण्यात आले. यशस्वीतेसाठी जिमलगट्टा महसूल मंडळाअंतर्गत सीताराम कुळमेथे, रामचंद्र कुमरे, श्रीनिवास पानेम, रूपेंद्र तलांडी, सोमना गावळे, अशोक दिकोंडा, राहुल गोडबोले आदी कोतवालांनी सहकार्य केले.योजनेचा लाभ घ्यामहसूल विभागाच्या वतीने आर्थिक लाभाच्या विविध योजना राबविल्या जातात. राष्ट्रीय वृद्धापकाळ, निराधार, अपंग, विधवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेऊन मासिक मानधनाचा योग्य उपयोग करावा, असे आवाहन अहेरीचे नायब तहसीलदार अनिल गुट्टे यांनी यावेळी केले.